Ducati Monster भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Sep 23, 2021 | 9:25 PM

2021 डुकाटी मॉन्स्टर (Ducati Monster) भारतात लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि डुकाटी मॉन्स्टर प्लस व्हेरिएंटसाठी 11.24 लाख रुपये इतकी आहे.

Ducati Monster भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us on

मुंबई : 2021 डुकाटी मॉन्स्टर (Ducati Monster) भारतात लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि डुकाटी मॉन्स्टर प्लस व्हेरिएंटसाठी 11.24 लाख रुपये इतकी आहे. डुकाटीचा मॉन्स्टर ब्रँड 25 वर्षांपेक्षा जुना आहे आणि डुकाटीच्या पोर्टफोलिओचे नेतृत्व करतो. मॉन्स्टर हे एक नवीन मॉडेल आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अपडेट्ससह लाँच करण्यात आलं आहे. ज्यात चेसिस, इंजिन, डिझाइन आणि फीचर्सचा सेट समाविष्ट आहे. (2021 Ducati Monster launched in India today, Price and features)

नवीन मॉन्स्टरसाठी बुकिंग एका आठवड्यापूर्वी सुरू झाली आहे आणि इच्छुक ग्राहक कोणत्याही डुकाटी डीलरशिपवर 1 लाख रुपयांसर मोटारसायकल बुक करू शकतात. नवीन मॉन्स्टरच्या डिझाइनमध्ये एक अपडेट देखील पाहिले गेले आहे. मोटरसायकल पूर्वीपेक्षा खूपच स्लिम आणि चांगली दिसतेय. पॅनेल आणि हेडलाईटची रचना वेगळी आहे आणि हेडलाइटच्या भोवती एलईडी रिंग चांगली दिसते. मागचा भागही स्मूद दिसतो आणि मोटरसायकलचे सिल्हूट पूर्वीपेक्षा स्पोर्टी वाटते.

नव्या मॉन्स्टरची खासियत

  • नवीन मॉन्स्टरमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे पूर्वीपेक्षा हलके आहेत.
  • फ्रंटला ट्विन Brembo M4.32 4 पिस्टन मोनोब्लॉक कॅलिपर मिळतात, जे दोन 320 मिमी डिस्कसह येतात.
  • बाईकच्या मागील बाजूस ब्रेम्बो कॅलिपर्सने ग्रिप केलेली एक सिंगल 245 मिमी डिस्क आहे. फ्रंट ब्रेक प्रमाणे, मागील कॅलिपरला देखील सिन्टर्ड ब्रेक पॅड्स मिळतात.
  • नवीन मॉन्स्टरचे इंजिन देखील एक नवीन युनिट आहे. एल-ट्विन इंजिन 937 सीसीसह देण्यात आलं आहे जे लिक्विड-कूल्ड आहे. हेच इंजिन डुकाटी हायपरमोटर्ड आणि 2021 डुकाटी सुपरस्पोर्टला देखील पॉवर देतं
  • मॉन्स्टरमध्ये हे इंजिन 9,250 आरपीएमवर 110 बीएचपी पॉवर आणि 6,500 आरपीएमवर 93 एनएम पीक टॉर्कसह आउटपुट देते.
  • इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे आणि डुकाटी स्टँडर्ड फिटमेंट म्हणून बाय-डायरेक्शनल फास्ट-शिफ्टर ऑफर करते.
  • नवीन डुकाटी मॉन्स्टरला एबीएस, कॉर्नरिंग एबीएस, पॉवर लॉन्च, ट्रॅक्शन कंट्रोल आणि व्हीली कंट्रोलसह राइड-बाय-वायर आणि तीन रायडिंग मोडसह ही बाईक सादर करण्यात आली आहे. स्पोर्ट, टूरिंग आणि अर्बन असे तीन मोड्स देण्यात आले आहेत.
  • सर्व मोड्स रायडरला त्याच्या हिशेबाने अॅडजस्ट करण्याची सुविधा प्रदान करतात. नवीन डुकाटी मॉन्स्टरमध्ये पॅनिगेल वी4 कडून प्रेरित असलेल्या ग्राफिक्ससह 4.3 इंचांचा फुल कलर टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोलही देण्यात आला आहे.
  • जागतिक स्तरावर, मिडिलवेट मोटरसायकलला मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लस अशी दोन रूपे मिळतात. हेडलाइटच्या वर फ्लायस्क्रीन आणि मागील सीटसाठी कव्हर मिळते.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(2021 Ducati Monster launched in India today, Price and features)