AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

मारुतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्च वाढवल्यानंतर कंपनीने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहनांच्या एक्स-शोरूम किमतीत (नवी दिल्ली) सरासरी 1.9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?
Tata Motors
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Sep 21, 2021 | 1:40 PM
Share

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी टाटा मोटर्स आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा 1 ऑक्टोबरपासून आपल्या कारच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. स्टीलसह इतर अनेक गोष्टींच्या किमतीमुळे कंपनीचा खर्च वाढलाय. म्हणूनच कंपनी किंमत वाढवण्याची तयारी करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मारुती सुझुकी इंडियाने (MSI) सेलेरियोवगळता आपल्या सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढवल्यात.

मारुतीने संपूर्ण वर्षात तीनदा किमती वाढवल्या

मारुतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्च वाढवल्यानंतर कंपनीने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहनांच्या एक्स-शोरूम किमतीत (नवी दिल्ली) सरासरी 1.9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. मारुती सुझुकी इंडियाने यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिसऱ्यांदा किमती वाढवल्या. यापूर्वी कंपनीने जानेवारी आणि एप्रिलमध्ये एकूण किमती सुमारे 3.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

टाटाची विक्री टॉप गिअरमध्ये

टाटा मोटर्सची विक्री टॉप गियरमध्ये आहे. ऑगस्टमध्ये कंपनीची एकूण विक्री 53 टक्क्यांनी वाढली. ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने एकूण 54,190 वाहने विकलीत. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने 35,420 वाहने विकली. कंपनीने म्हटले आहे की, देशांतर्गत बाजारपेठेत त्याच्या प्रवासी वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये 28,018 इतकी होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 18,583 होती. ऑगस्ट 2020 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये संख्येच्या बाबतीत कंपनीच्या विक्रीत 51 टक्के वाढ झाली.

ऑटो क्षेत्रासाठी सरकारची मोठी घोषणा

सरकारने गेल्या आठवड्यात वाहन, वाहन घटक उद्योगासाठी PLI योजना मंजूर केली, यासाठी सरकारने 26,058 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे 7.6 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळतील. हे प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान उत्पादनांसाठी स्वदेशी जागतिक पुरवठा साखळी विकसित करण्यात मदत करेल.

विद्यमान ऑटो कंपनी व्यतिरिक्त या योजनेचा लाभ त्या कंपन्यांना देखील उपलब्ध होईल, जे ऑटोमोबाईल किंवा ऑटो घटक उत्पादन व्यवसायात नाहीत.

ऑटो पीएलआय योजनेचे दोन भाग आहेत. पहिला भाग चॅम्पियन OEM प्रोत्साहन योजना आहे जी विक्री मूल्य जोडलेली योजना आहे. ही योजना बॅटरी इलेक्ट्रिक वाहन, हायड्रोजन इंधन सेल वाहनासाठी आहे.

दुसरा भाग घटक विजेता प्रोत्साहन योजना आहे. ही सेल्स व्हॅल्यू स्कीम आहे जी वाहनाचे प्रगत स्वयंचलित तंत्रज्ञान घटक, पूर्णपणे नॉक डाऊन (सीकेडी) आणि सेमी सीकेडी, 2 व्हीलर वाहन एग्रीगेटर, 3 व्हीलर व्हेईकल एग्रीगेटरसाठी आहे. यात प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टरचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

सरकारच्या मदतीने हा बंपर कमाईचा व्यवसाय सुरू करा, तुम्हाला दरमहा चांगले उत्पन्न मिळणार

GeM वर नोंदणीकृत 1.77 लाखांपेक्षा जास्त कारागीर, विणकरांनी केली नोंदणी, तुम्हीही सामील व्हा

After Maruti, now your favorite Tata car will become more expensive, find out how much the price will go up?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली