बहुप्रतीक्षित Jeep Compass SUV 27 जानेवारीला भारतात लाँच होणार, फिचर्सच्या बाबतीत हेक्टर आणि हॅरियरहून दमदार?

बहुप्रतीक्षित 2021 Jeep Compass SUV 27 जानेवारीला भारतात लाँच केली जाणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित Jeep Compass SUV 27 जानेवारीला भारतात लाँच होणार, फिचर्सच्या बाबतीत हेक्टर आणि हॅरियरहून दमदार?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 11:50 AM

मुंबई : जीप इंडियाने (Jeep India) गेल्या आठवड्यात 2021 Compass SUV वरुन पडदा हटवला होता. आता कंपनीने नवी घोषणा करताना म्हटले आहे की, ही एसयूव्ही 27 जानेवारीला भारतात अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. दरम्यान या अपकमिंग एसयूव्हीसाठी प्री-बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. अशातच जेव्हा या कारच्या किंमतीची अधिकृत घोषणा केली जाईल, त्याच दिवसापासून प्री-बुकिंग करण्याऱ्यांना गाडीची डिलीव्हरी देणं सुरु केलं जाईल. (2021 Jeep Compass SUV to launch on January 27 In India)

या गाडीची किंमत 15 लाख रुपये ते 22 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी असू शकते. लाँचिंगनंतर या कारची ह्युंदाय Tucson, टाटा हॅरियर आणि एमजी हेक्टर या कार्ससोबत टक्कर होणार आहे. 2021 Compass SUV मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची स्टाईल आणि फिचर्स. त्यामुळे असं म्हटलं जातंय की ही कार तिच्या सेगमेंटमधील इतर कार्सना मागे टाकणार आहे.

नवं आणि जबरदस्त इंटिरियर

या SUV मध्ये तुम्हाला स्लॉट ग्रिल, ट्रेपीजॉयडल व्हील आर्क्स, रिफ्लेक्टर्ससह हेडलाइट्स यूनिट आणि LED प्रोजेक्टर्स मिळतील. गाडीच्या इंटिरियरमध्ये तुम्हाला बरेच बदल जाणवतील. दमदार लुक्ससाठी या कारमध्ये मेटल ब्रोसह मिड बोल्स्टर पीस मिळेल. कंपनीने या कारचं डॅशबोर्ड डिझाईन अपडेट केलं आहे. तसेच या कारमध्ये तुम्हाला रिस्टाइल्स डॅशबोर्ड मिळेल जो 10.1 इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह असेल. यामध्ये तुम्हाला नवीन एसी वेंट आणि HVAC कंट्रोलही मिळेल. नवीन टचस्क्रीन FCA यूकनेक्ट 5 इन्फोटेनमेंट सिस्टिमसह मिळेल. यामध्ये तुम्हाला अमेझॉन अॅलेक्सा सपोर्ट, एपल कार प्लेदेखली मिळेल.

इंजिन

कंपास फेसलिफ्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये नवीन इंजिनासह येणार आहे. या गाडीत तुम्हाला 2.0 लीटर डीझेल इंजिन मिळेल जे 173hp आणि 350nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये तुम्हाला 1.4 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 163 hp आणि 250nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅनुअल स्टँडर्डसह येतात. पेट्रोलमध्ये ग्राहकांना 7 स्पीड डुअल क्लच ऑटोमॅटिक ऑप्शन देण्यात आला आहे. तर डिझेलमध्ये नाइन स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटो ऑप्शन दिला आहे.

आकर्षक डिझाईनची सर्वांना भुरळ

आकर्षक फिचर्स

या कारमध्ये तुम्हाला वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉयड ऑटो कनेक्शनसह स्टियरिंग व्हीलवर देण्यात आलेल्या बटन्सच्या मदतीने तुम्ही स्क्रीन हाताळू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला 360 डिग्रीचा रिमोट कॅमेरा, क्रूज कंट्रोल आणि बटनद्वारे हाताळता येईल असं पॉवरलिफ्ट गेट देण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, सेलेकटरेन 4×4 सिस्टिम, सहा एयरबॅग्स, पॅनिक ब्रेक असिस्ट, पावसाळ्यात वापरता येणारा ब्रेक सपोर्ट यांसारख्या 50 हून अधिक सुविधा दिल्या आहेत.

हेही वाचा

टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?

Electric Car | पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त, एक युनिट चार्जिंगवर ‘इतके’ किलोमीटर धावेल इलेक्ट्रिक कार!

Tesla India : मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री

(2021 Jeep Compass SUV to launch on January 27 In India)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.