AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेट्रो लूक आणि ढासू फीचर्ससह Yamaha XSR900 ची जागतिक बाजारात धडक, जाणून घ्या सर्वकाही

Yamaha ने जागतिक बाजारात लेटेस्ट लूकवाली Yamaha XSR900 सादर केली आहे. यामाहाने ही नवीन बाईक इंटिरिअरपासून एक्सटीरियरपर्यंत अनेक अपडेट्ससह सादर केली आहे.

रेट्रो लूक आणि ढासू फीचर्ससह Yamaha XSR900 ची जागतिक बाजारात धडक, जाणून घ्या सर्वकाही
Yamaha XSR 900
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई : Yamaha ने जागतिक बाजारात लेटेस्ट लूकवाली Yamaha XSR900 सादर केली आहे. यामाहाने ही नवीन बाईक इंटिरिअरपासून एक्सटीरियरपर्यंत अनेक अपडेट्ससह सादर केली आहे. कंपनीने यामध्ये गोल्डन फ्रंट, रुंद हँडलबार सादर केला आहे. नवीन बाईकसाठी फ्यूल टँक रिडिझाईन केला आहे. टेल सेक्शनमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. ही बाईक लीजंड ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या दोन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. (2022 Yamaha XSR900 breaks cover as an all-new model)

यामाहा बाईक अॅल्युमिनियम फ्रेमसह अपडेट करण्यात आली असून हँडलिंगमध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे. अॅल्युमिनियम फ्रेममुळे बाइकचे वजन कमी होते. अपडेटेड फ्रेममुळे हँडलिंगमध्ये सुधारणा झाल्याचा कंपनीचा दावा आहे. यामाहा बाईकला अॅल्युमिनियम फ्रेममधूनच कर्वी टफनेस मिळतो. लुकबद्दल बोलायचे तर त्याची रचना 70 च्या दशकातील बाईकपासून प्रेरित आहे. दरम्यान, कंपनीने अद्याप या बाईकच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही.

दमदार इंजिन

यामाहाच्या या बाईकमध्ये 889 cc चे इंजिन देण्यात आले आहे, जे 846 cc च्या आधीच्या व्हर्जनमध्ये देण्यात आले होते. याला जुन्या बाईकपेक्षा 4bhp जास्त पॉवर मिळते, या इंजिनची एकूण पॉवर 117.3bhp आहे. अपडेटेड पॉवरट्रेन व्यतिरिक्त, ब्रेकिंग सेटअप ब्रेम्बो रेडियल मास्टर सिलेंडर आणि अॅडजस्टेबल लीव्हर्ससह सुधारित केले गेले आहे.

चार नवीन राइड्सचा समावेश

कंपनीने या बाइकमध्ये 3.5-इंचाची टीएफटी स्क्रीन दिली आहे, जी जुन्या मॉडेलच्या एलसीडीला रिप्लेस करते. कंपनीने यामध्ये चार नवीन राइड्सचा समावेश केला आहे, ज्यामध्ये स्लाईड आणि व्हील कंट्रोलसह लीन अँगल, सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश आहे.

व्हीलबेसमध्ये बदल

कंपनीने नवीन बाईकचा व्हीलबेस देखील बदलला आहे जो जुन्या व्हेरिएंटपेक्षा लांब आहे आणि रायडर्सना अधिक फायदे देतो. लाइट्स विभागाबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यातील बहुतेक लँप एलईडी लाईट्समध्ये रिप्लेस केले आहेत.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(2022 Yamaha XSR900 breaks cover as an all-new model)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.