
5-Seater Cars In India: भारतात अनेक 5- आसनी कार बाजारात आल्या आहेत. त्यात काही बजेट फ्रेंडली कार उपलब्ध असून ज्यांची किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे. या कार अनेक शानदार फिचर्ससह येतात आणि मायलेज देखील चांगले देतात.जर तुमच्या घरात पाच फॅमिली मेंबर आहेत आणि तुम्हाला एक चांगली आणि स्वस्त कार खरेदी करायची आहे. तर चांगले पर्याय कुठले ते पाहूयात….
या कारमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा आणि हुंडई कंपनीचे दमदार मॉडेल आहेत
हुंडई व्हेन्यू एक दमदार 5-सीटर कार आहे. हुंडई्च्या या कारमध्ये Kappa 1.2 MPi पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 61 kW पॉवरचे असून 114.7 Nm चे टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये U2 1.5 l CRDi डीझेल इंजिनचा पर्याय देखील आहे. डिझेल इंजिन 85 kW पॉवर आणि 250 Nm चा टॉर्क जनरेट करते. हुंडई व्हेन्यू मध्ये Kappa 1.0 Turbo GDi पेट्रोल इंजिन देखील मिळते, ज्यातून 88.3 kW ची पॉवर मिळते आणि 172 Nm चा टॉर्क जनरेट होतो. हुंडईच्या या बजेट-फ्रेंडली कारची एक्स-शोरूम किंमत 7.90 लाख रुपयांपासून सुरू होऊन 15.69 लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्रा XUV 3XO ही देखील शानदार पर्याय आहे. ही कार तीन विविध पॉवर ट्रेनसह येते. या गाडीत एक 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजन मिळते, जे 82 kW ची पॉवर आणि 200 Nm ची टॉर्क जनरेट करते. XUV 3XO मध्ये दुसरे 1.2-लिटर TGDi पेट्रोल इंजन मिळते, ज्यात 96 kW ची पॉवर मिळते आणि आऊटपुटवर 230 Nm चा टॉर्क जनरेट होतो. ही कार 1.5-लिटर टर्बो डीझेल इंजनसह देखील मिळते. ज्यास 86 kWची पॉवर आणि 300 Nm चा टॉर्क जनरेट होतो. महिंद्र XUV 3XO ची एक्स शोरुम किंमत 7.28 लाख रुपयांपासून सुरु होऊन 14.40 लाख रुपयांपर्यंत जाते.
टाटा पंच 31 व्हेरिएंट्स सोबत मार्केटमध्ये आहे. या 5- आसनी कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पॉवरट्रेन पर्याय मिळतात. पंचच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिन लावलेले आहे.87.8 PS ची पॉवर आणि 115 Nm चा टॉर्क त्यापासून मिळतो. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये लावलेल्या 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिनाने 73.5 PS ची पॉवर आणि 103 Nm चा टॉर्क मिळतो. टाटा पंचची एक्स शोरुम किंमत 5.50 लाख रुपयांपासून सुरु होऊन 9.30 लाख रुपयांपर्यंत जाते.