AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर कपूर याची लाखमोलाची Range Rover कार तुम्हीही खरेदी करू शकतो; कशी? वाचा…

रणबीरच्या मालकीची रेंज रोव्हर SUV मध्ये खूप वेगळी डिझाइन आणि अनेक तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. आता तुम्हाला ही कार खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

रणबीर कपूर याची लाखमोलाची Range Rover कार तुम्हीही खरेदी करू शकतो; कशी? वाचा...
| Updated on: Apr 27, 2023 | 12:30 PM
Share

मुंबई : रणबीर कपूरकडे (Ranbir kapoor) आलिशान गाड्यांचा मोठा संग्रह आहे. अभिनेत्याकडे रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) देखील आहे. या कारमध्ये रणबीर अनेकदा बसलेला दिसला आहे. रेंज रोव्हरची ही एसयूव्ही तुम्हीही खरेदी करू शकता. विश व्हील्स इंडिया नावाच्या कार डीलरशिपने इंस्टाग्रामवर रेंज रोव्हर वेलारची जाहिरात पोस्ट केली आहे. हे मॉडेल 2018 सालचे आहे.

Velar SUV चे डिझाईन, ॲडव्हान्स इन्फोटेनमेंट युनिट आणि उत्कृष्ट ऑफ-रोडिंग कौशल्य यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तुम्हाला अशी टॉप परफॉर्मन्स कार घ्यायची असेल तर तुम्ही डीलरशी बोलू शकता. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे – आता तुम्हालाही स्टारप्रमाणे कार चालवण्याची संधी आहे. जाणून घ्या त्याचे काही तपशील…

सेकंड हँड रेंज रोव्हर वेलारचे डिटेल्स

  1. सेलमध्ये उपलब्ध असलेली रेंज रोव्हर कार 2018 मध्ये खरेदी करण्यात आली होती. डीलरच्या म्हणण्यानुसार, ही पांढऱ्या रंगाची कार एका सेलिब्रिटीने खरेदी केली होती आणि आता ती विकली जात आहे. SUV चा विमा देखील वैध आहे आणि तिचा आतापर्यंत फक्त 18,000 किमी प्रवास झाला आहे.
  2. या कारमध्ये ऑटो पार्क असिस्ट, आयनाइज्ड रीअर स्टीयरिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, रिअर रिक्लायनिंग सीट्स, इन-कार स्मोक रिफ्रेशर, 3-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, एअरमॅटिक सस्पेंशन आणि मेरिडियन साउंड सिस्टीम यांसारखी भक्कम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
  3. या कारमध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हा कॉम्बो 247 PS पॉवर आणि 365 Nm टॉर्क जनरेट करतो.
  4. या सेकंड हँड कारच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, जर कोणाला ते विकत घेण्यास स्वारस्य असेल तर ते तपशील जाणून घेण्यासाठी +919967164485 वर कॉल करू शकतात. लॉन्चच्या वेळी या एसयूव्हीची किंमत सुमारे 80 लाख रुपये होती.

नोट : ही कार रणबीरची आहे, हा आमचा दावा नाही. डीलरशिपच्या सांगण्यानुसार हे 2018 चे मॉडेल आहे जे रणबीरकडे होते. तुम्हाला ही कार घेण्यास स्वारस्य असल्यास, त्याबद्दल पुरेस तपास व संशोधन केल्यानंतरच पुढे जा.

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.