मोठी संधी ! 1.6 लाखात खरेदी करा Alto 800, जाणून घ्या काय आहे ऑफर?

मारुती सुझुकी Alto 800 LXI ही कार अगदीच कमी किमतीत विकत आहे. (alto 800 lxi maruti suzuki refurbished car)

  • Publish Date - 1:22 am, Tue, 9 March 21
मोठी संधी ! 1.6 लाखात खरेदी करा Alto 800, जाणून घ्या काय आहे ऑफर?
Alto 800 car

मुंबई : आपल्या घरासमोरसुद्धा एक कार उभी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, जवळ पुरेसे भांडवल नसल्यामुळे ही इच्छा अनेकांना आपल्या मनातच ठेवावी लागते. मात्र, कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. कमी किमतीत एखादी उत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही नामी संधी असू शकते. मारुती सुझुकी Alto 800 LXI ही कार अगदीच कमी किमतीत विकत आहे. (alto 800 lxi car in just 1 lakh 62 thousand rupees refurbished car maruti suzuki)

Alto 800 LXI कार फक्त 1 लाख 62 हजार रुपयांमध्ये

मारुती सुझुकीने ट्रू व्हॅल्यू या आपल्या वेबसाईटवर Alto 800 LXI ही कार फक्त 162000 रुपयांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. ट्रू व्हॅल्यू या वेबसाईटच्या माध्यमातून मारुती सुझुकी ही कंपनी आपल्या जुन्या कार रिफर्बिश करुन विकते. Alto 800 LXI ही कारसुद्धा कंपनीने रिफर्बिश अशा स्वरुपात ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. या कारची किंमत सध्या 1 लाख 62 हजार रुपये आहे.

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध असलेली ही कार 2016 सालाची आहे. या कारने आतापर्यंत 31218 किलोमीटर केलेला असून तिचा रंग पांढरा आहे. या कारला आतापर्यंत फक्त एकाच माणसाने चालवलेले आहे. ही गाडी पेट्रोलवर चालते.

खरेदी केल्यास सहा महिन्यांची वॉरंटी

Alto 800 LXI ही कार ट्रू वॅल्यू सर्टिफाईड आहे. तसेच, ही कार खरेदी केल्यानंतर ग्राहकांना अनेक प्रकारचे बेनिफिट्स कंपनीतर्फे देण्यात आले आहेत. कारला विकत घेतल्यानंतर सहा महिन्यांची वॉरंटी असेल. तसेच कंपनीतर्पे तीन सर्विहेस मोफत करुन दिल्या जातील. या कारची टेस्ट ड्राईव्ह करण्याचीसुद्धा सोय आहे. त्यासाठी ट्रू व्हॅल्यू या वेबसाईटवर जाऊन आपले नाव, मेल, मोबाईल नंबर रजिस्टर करुन कारची टेस्ट ड्राईव्ह करता येते. जर कार आवडलीच तर तिला तुम्ही खरेदीसुद्धा करु शकता. कारवीषयी अधिक महिती हवी असेल तर ती (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-sagar-2016/AXfd3OzyZPsTbFxud9_V) या लिंकवर मिळेल.

दरम्यान, या कारसंदर्भात टॅू व्हॅल्यू या वेबसाईटने माहिती दिलेली असली तरी संपूर्ण खात्री केल्याशिवाय कोणताही व्यवहार करु नका. तसेच वाहनांसंबंधीची माहिती असलेल्या जाणकाराशी एकदा जरुर चर्चा करावी.

इतर बातम्या :

या महिन्यात तीन नव्या SUV लाँच होणार, जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट कार कोणती?

टाटाच्या ‘या’ कारची MG Hector आणि Hector Plus वर मात, SUV चा भारतीय बाजारात धुमाकूळ

Skoda Kushaq चं इंटर्नल स्केच जारी, पहिल्या मेड इन इंडिया कारमध्ये काय खास असणार?

(alto 800 lxi car in just 1 lakh 62 thousand rupees refurbished car maruti suzuki)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI