Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?
Samsung Galaxy S21 FE 5G (Photo : Samsung.in)

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर अमेझॉन इंडिया (Amazon India) ने मोठी सवलत जारी केली आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 22, 2022 | 4:19 PM

मुंबई : Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर अमेझॉन इंडिया (Amazon India) ने मोठी सवलत जारी केली आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. सध्या हा प्रीमियम स्मार्टफोन किमान 49,999 रुपयांना खरेदी करता येईल. Samsung Galaxy S21 FE 5G नुकताच भारतात 54,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण, आता तुम्ही Amazon वरुन हा फोन 49,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याचा अर्थ कंपनी यावर 5,000 रुपयांची सूट देत आहे. ही किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशन असलेल्या व्हेरिएंटसाठी आहे.

या फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे आणि हे व्हेरिएंट 58,999 रुपयांवरून आता 53,999 रुपयांमध्ये विकलं जात आहे. ई-कॉमर्स जायंट बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्सवर 1,250 रुपयांपर्यंत आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांपर्यंत किंवा 10 टक्के सूट देखील देत आहे. सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात 120hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G चे फीचर्स

  • हा सॅमसंग फोन अमेझॉनवर लिस्टेड आहे. हा फोन चार कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे, जो ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ऑलिव्ह आणि व्हाइट कलरमध्ये येतो.
  • Samsung Galaxy S21 FE 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे. अंडर द हुड बद्दल बोलायचे झाले तर हा फोन ऑक्टा-कोर चिपसेट सह येतो. यात 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे.
  • याच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, जो वाइड अँगल लेन्ससह येतो. याशिवाय, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा सॅमसंग फोन 4500mAh बॅटरीसह येतो, जो 25W वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह येतो.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें