AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर 25 ऑगस्टला बाजारात, अवघ्या 20 पैशात एक किलोमीटरचा प्रवास

eBikeGo ही कंपनी भाड्याने इलेक्ट्रिक वाहनं पुरवते, ही कंपनी लवकरच एक नवीन 'Rugged' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर 25 ऑगस्टला बाजारात, अवघ्या 20 पैशात एक किलोमीटरचा प्रवास
Ebikego Scooter
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 23, 2021 | 4:48 PM
Share

मुंबई : eBikeGo ही कंपनी भाड्याने इलेक्ट्रिक वाहनं पुरवते, ही कंपनी लवकरच एक नवीन ‘Rugged’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर 25 ऑगस्ट रोजी eBikeGo च्या नवीन ब्रँड अंतर्गत सादर केली जाईल. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात मजबूत स्कूटर असेल. ही स्कूटर भारतातच डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करण्यात आली आहे. (Ebikego is will launch new electric scooter, drive 1Km in just 20 paisa)

या इलेक्ट्रिक स्कूटरला आयसीएटीची (ICAT) मान्यता मिळाली आहे आणि ती फेम II सबसिडीसाठी देखील पात्र असेल. ही स्कूटर 25 ऑगस्ट रोजी सादर केली जाईल आणि यासाठी लिमिटेड प्री-ऑर्डर घेण्यात येतील. EBikeGo ने दावा केला आहे की नवीन स्कूटर EBGmatics (IoT टेक्नोलॉजीसाठी eBikeGo ची प्रॉपर्टी) द्वारे गोळा केलेल्या लाखो डेटा पॉइंट्स अ‍ॅनालाईज करुन तयार केली गेली आहे.

EBikeGo चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान म्हणाले की, आम्ही एक मजबूत इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर आम्ही या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला असं किफायतशीर इलेक्ट्रिक वाहन बनवायचं आहे जे सामान्य लोकांना सहजपणे स्वीकारता येईल.

चार्जिंग आणि प्रवासासाठी किती खर्च होईल?

eBikeGo ने अलीकडेच घोषणा केली आहे की, ते देशातील पाच शहरांमध्ये 3,000 आयओटी सक्षम सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी काम करतील. हे चार्जिंग स्टेशन संबंधित शहरांमध्ये दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करू शकतील. या चार्जिंग स्टेशन्सवर सहज प्रवेश करण्यासाठी, ते इंटरनेटशी जोडलेले असतील आणि ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून चार्जिंग स्टेशनचा वापर करू शकतील.

यासह, कंपनी स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशनदेखील प्रदान करेल, जेणेकरून वापरकर्त्यांना वाहन चार्ज करण्यासाठी किती युनिट्स वापरलं गेलं याबाबतची माहिती मिळू शकेल. ग्राहक या चार्जिंग स्टेशनवर UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा रोख पेमेंट करू शकतील. eBikeGo च्या मते, या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी सुमारे 20-50 पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल, जे पेट्रोल वाहनांपेक्षा सुमारे पाच पट स्वस्त असेल.

इतर बातम्या

अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास

(Ebikego is will launch new electric scooter, drive 1Km in just 20 paisa)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?