AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

होंडाने (Honda) काही दिवसांपूर्वी आपली इलेक्ट्रिक स्कूटर होंडा यू-गो (Honda U-Go) लाँच केली आहे. ही होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे,

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज
Honda U Go Electric Scooter
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 4:01 PM
Share

मुंबई : जगभरात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, म्हणूनच वाहन उत्पादक कंपन्या वेगाने इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी होंडाने (Honda) काही दिवसांपूर्वी आपली इलेक्ट्रिक स्कूटर होंडा यू-गो (Honda U-Go) लाँच केली आहे. ही होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची किंमत 7499 युआन (जवळपास 86,000 रुपये) आहे. ही स्कूटर होंडाची चीनी उपकंपनी युआंग होंडा ने लाँच केली आहे. (Honda U go electric scooter can 130KM range in single charge)

सिटी रायडिंगसाठी तयार करण्यात आलेल्या या लाइटवेट ई-स्कूटरचे दोन प्रकार आहेत जे स्पीड आणि पॉवरसह येतात. Honda U GO चे स्टँडर्ड मॉडेल 1.2 kW कंटीन्यूअस रेटेड हब मोटरसह येईल जे 1.8 kW चे पीक आउटपुट देईल. या व्हर्जनचा टॉप स्पीड 53 kmph इतका आहे. लो स्पीड मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, हे 1.2 kW पॉवरसह 800 W कंटीन्यूअस हब मोटरसह येते. त्याचं टॉप स्पीड 45 किमी प्रतितास इतकं आहे. दोन्ही मॉडेल्स 1.44 kWh क्षमतेच्या 48V आणि 30Ah रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज आहेत. याचं पॉवरट्रेन 65 किमीची रेंज देतं, जे दुसऱ्या बॅटरीच्या जोडणीसह 130 किमीपर्यंत वाढवता येते.

Honda U-GO मध्ये LCD स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्याद्वारे युजर्सना स्कूटरचा स्पीड, रेंज, चार्जिंग आणि रायडिंग मोडची माहिती दिली जाते. स्कूटर फ्रंट एप्रनवर ट्रिपल बीमसह एलईडी हेडलाइटला सपोर्ट करते. मेन क्लस्टरभोवती एलईडी डीआरएल स्ट्रिप देखील आहे. ई-स्कूटरमध्ये 12-इंच फ्रंट आणि 10-इंच रियर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तसेच यात 26 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस आहे.

होंडाने ही इलेक्ट्रिक स्कूटर चीनी बाजारपेठेत सादर केली आहे आणि त्याची किंमत 7,499 RMB ($ ​​1,150) पासून सुरू होते, म्हणजेच भारतीत रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 86,000 रुपये इतकी आहे. अहवालात असे म्हटले आहे की, होंडा ही इलेक्ट्रिक स्कूटर इतर बाजारांमध्येदेखील सादर करणार आहे.

Honda U-Go मध्ये खास फीचर्स

कंपनीने या स्कूटरसाठी मिनिमल डिजाइन अप्रोच ठेवला आहे. त्याला एप्रनमध्ये ट्रिपल बीम आणि मुख्य क्लस्टरच्या बाजूने एलईडी डीआरएल स्ट्रिपसह एक पातळ एलईडी हेडलाइट मिळते. त्याचे एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रेंज, बॅटरी स्टेटस, राईडिंग मोड आणि स्पीड सारखी प्राथमिक माहिती देतं. याशिवाय या स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि अँटी-थेफ्ट अलार्म देखील देण्यात आला आहे. ही स्कूटर भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र ही स्कूटर लवकरच भारतीय बाजारात दाखल होईल, असे म्हटले जात आहे.

इतर बातम्या

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर Tesla Model 3 चं टेस्टिंग, भारतात लाँचिंग कधी?

(Honda U go electric scooter can 130KM range in single charge)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.