Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये या स्कूटरसाठी कंपनीला तब्बल 30,000 हून अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत,

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक
Simple One Electric Scooter

मुंबई : इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप सिंपल एनर्जीने (Simple Energy) देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 1.10 लाख रुपये या किंमतीमध्ये (एक्स-शोरूम) नुकतीच लाँच केली आहे. कंपनीने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर बुकिंग्स घेणे सुरु केले आहे. 1,947 रुपये रिटर्नेबल (परत करण्यायोग्य) टोकन रकमेसह ग्राहक ही स्कूटर बुक करु शकतात. (Simple One Electric Scooter gets 30000 Bookings in 4 days, You Can Also Book by Paying 1947 rupees)

ही इलेक्ट्रिक स्कूटर 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये या स्कूटरसाठी कंपनीला तब्बल 30,000 हून अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दहा लाख वाहनांची वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या तामिळनाडूच्या होसूर येथील EV निर्मात्या कंपनीच्या प्लांटमध्ये सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली जाईल. ई-स्कूटर पहिल्या टप्प्यात कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशसह देशभरातील एकूण 13 राज्यांमध्ये उपलब्ध केली जाईल.

सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 4.8 kWh पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे, या बॅटरीचं वजन 6 किलोपेक्षा जास्त आहे. या स्कूटरच्या डिटॅचेबल आणि पोर्टेबल नेचरमुळे ई-स्कूटरची बॅटरी घरी चार्ज करणे सोपे होईल. साध्या लूप चार्जरने जरी ही स्कूटर चार्ज केली तरी 60 सेकंदांच्या चार्जिंगवर ही स्कूटर 2.5 किमीपर्यंत धावेल. EV कंपनी पुढील तीन ते सात महिन्यांत देशभरात 300 हून अधिक फास्ट चार्जरदेखील स्थापित करेल.

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज, परफॉर्मन्स

ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेंज प्रदान करेल. या स्कूटरचं टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतकं आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रति तास, 0 ते 40 किमी प्रति तास वेग 2.95 सेकंदात धारण करु शकते. स्कूटरला 4.5 KW चे पॉवर आउटपुट आणि 72 Nm चे टॉर्क मिळते.

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचरिस्टिक डिझाईनला सपोर्ट करेल आणि मिड-ड्राइव्ह मोटरवर आधारित असेल. यात 30 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे, 12-इंचांची चाके, 7-इंचांचा डिजिटल डॅशबोर्ड, ऑन-बोर्ड नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, एसओएस मेसेज, डॉक्यूमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल.

सिंपल वन ई-स्कूटर रेड, व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू अशा चार कलर ऑप्शनमध्ये येते. सिंपल वन ई-स्कूटर Ather, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

पेट्रोल आणि डिझेल आता विसरा, तुमची कार पाण्याच्या मदतीने धावणार, जाणून घ्या

Vespa 75th एडिशन स्कूटर 19 ऑगस्टला बाजारात, जाणून घ्या काय असेल खास?

कमी किंमतीत ढासू फीचर्स, Royal Enfield ची शानदार बाईक ऑगस्ट अखेर लाँच होणार

(Simple One Electric Scooter gets 30000 Bookings in 4 days, You Can Also Book by Paying 1947 rupees)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI