देशातील पहिली बॅटरी स्वॅपेबल Bounce Electric Scooter लाँचिंगसाठी सज्ज, Ola S1 ला टक्कर

| Updated on: Nov 25, 2021 | 9:00 AM

बाउन्स इलेक्ट्रिकने (Bounce Electric) घोषणा केली आहे की कंपनी 02 डिसेंबरला त्यांची पहिली ऑल-इलेक्ट्रिक स्कूटर, बाउंस इन्फिनिटी लॉन्च करणार आहे.

देशातील पहिली बॅटरी स्वॅपेबल Bounce Electric Scooter लाँचिंगसाठी सज्ज, Ola S1 ला टक्कर
Bounce Electric Scooter
Follow us on

मुंबई : बाउन्स इलेक्ट्रिकने (Bounce Electric) घोषणा केली आहे की कंपनी 02 डिसेंबरला त्यांची पहिली ऑल-इलेक्ट्रिक स्कूटर, बाउंस इन्फिनिटी लॉन्च करणार आहे. या भारतीय स्टार्ट-अप कंपनीने जाहीर केले आहे की, लॉन्च झाल्यानंतर, बाउंस इन्फिनिटीचे बुकिंग सुरू केले जाईल, ज्याची बुकिंग रक्कम 499 रुपये इतकी असेल. स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. (battery swappable Bounce electric scooter will launch on 2nd December)

बाउन्स इन्फिनिटी ही पहिली अशी इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी, बॅटरीशिवाय खरेदी करण्याच्या पर्यायासह उपलब्ध असेल. एक पर्याय म्हणून, या स्कूटरचे खरेदीदार कंपनीच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा वापर करू शकतात, जे देशभरात सेट केले गेले आहे. बॅटरी स्कूटरखाली ठेवण्याऐवजी, या टचपॉइंट्सवर बाउन्स इन्फिनिटीला स्वॅपेबल बॅटरीने सुसज्ज केले जाऊ शकते, जेथे स्कूटर मालक ठराविक रक्कम भरून रिकामी बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेल्या बॅटरीने बदलू शकतात (स्वॅप करु शकतात).

रिमूव्हेबल बॅटरी सिस्टम

स्वॅपिंग नेटवर्क आणि पेमेंट सिस्टम व्यतिरिक्त, बाउंस इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर रिमूव्हेबल बॅटरीसह ऑफर केली जाईल, जी मालकाच्या घरी चार्ज केली जाऊ शकते. बाउन्स इन्फिनिटीची बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर आणि चेसिसचे स्पेसिफिकेशन्स 02 डिसेंबर रोजी उघड होण्याची अपेक्षा आहे.

Bounce Infinity ची निर्मिती त्यांच्या राजस्थानमधल्या भिवडी येथील उत्पादन केंद्रात केली जाईल. ज्यामध्ये Bounce Electric ने 100% हिस्सा घेतला आहे. या उत्पादन प्रकल्पाची उत्पादन क्षमता 180,000 युनिट्स इतकी आहे. एकदा लाँच झाल्यावर, Bounce Infinity Ola S1, Simple One, Bajaj Chetak, TVS iQube आणि Ather 450X सारख्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सना बाजारात टक्कर देईल.

तुम्हाला ही स्कूटर आवडल्यास, तुम्ही ती 499 रुपयांमध्ये बुक करू शकता. भारतात त्याची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या सुरुवातीला होईल.

इलेक्ट्रिक स्कूटर्सवर कंपन्यांचा फोकस

नवीन स्टार्ट-अप्सच्या आगमनाने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट वाढत आहे. या सेगमेंटमध्ये आधीपासूनच अॅथर, अँपिअर, प्युअर सारख्या ब्रँडच्या वाहनांमध्ये स्पर्धा आहे. Ola सारखे उत्पादक येत्या काही महिन्यांत या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहने सादर करतील. सध्या, ओलाने आपल्या स्कूटरसाठी हजारो बुकिंग स्वीकारल्या आहेत आणि सध्या काही समस्यांमुळे डिलिव्हरी पुढे ढकलली आहे.

कमी किंमतीत चांगली वाहनं मिळणार

बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी भारतातील स्टार्ट-अप इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले आहे. “अधिक उत्पादकांनी या व्यवसायात प्रवेश केल्याने, किंमती अधिक स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांना कमी किमतींत चांगली वाहने मिळतील,” असे बजाज यांना वाटते.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(battery swappable Bounce electric scooter will launch on 2nd December)