डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

काटी इंडियाने (Ducati India) Panigale V4 रेंजमध्‍ये नवीन Panigale V4 SP सोबत नवीन टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. 2021 Ducati Panigale V4 SP ची किंमत 36.07 लाख रुपये इतकी आहे,

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ducati Panigale V4 SP
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 6:00 AM

मुंबई : डुकाटी इंडियाने (Ducati India) Panigale V4 रेंजमध्‍ये नवीन Panigale V4 SP सोबत नवीन टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. 2021 Ducati Panigale V4 SP ची किंमत 36.07 लाख रुपये इतकी आहे, ही किंमत V4 S पेक्षा जास्त ठेवली आहे ज्याची किंमत 28.40 लाख रुपये इतकी आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. टॉप-ऑफ-द-लाइन Panigale V4 SP हे अधिक ट्रॅक फोकस केलेलं व्हेरिएंट आहे आणि वजन कमी करण्याच्या उद्देशाने यात अनेक अपग्रेड्स करण्यात आले आहेत. (Ducati Panigale V4 SP Motorcycle Launched in India, check Price and Features)

मोटारसायकलला काही ठिकाणी कार्बन फायबर बॉडीवर्कसह नवीन आणि हलके अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत, जे 1.4 किलो वजन कमी करण्यास मदत करतात. Ducati Panigale V4 SP ला स्टँडर्ड मॉडेल सारखेच डिझाईन मिळते परंतु ते स्पेशल ‘विंटर टेस्ट’ लुकपासून वेगळे आहे. नवीन लूक प्री-सीझन MotoGP आणि World SBK मोटरसायकलपासून प्रेरित आहे आणि रेड अॅक्सेंटसह ब्लॅक पेंट स्कीम आणि फ्यूल टँकवर ब्रश-अॅल्युमिनियम फिनिश आहे.

नवीन डुकाटी मोटरसायकलमध्ये काय आहे खास?

इतर अपग्रेड्समध्ये V4 S वर ब्रश केलेल्या अॅल्युमिनियम चाकांवर मार्चेसिनी ब्रश्ड मॅग्नेशियम व्हील आणि पिरेली डायब्लो सुपरकोर्सा SP टायर्समध्ये समाविष्ट आहेत. हे मॉडेल कार्बन फायबर विंग्स, हील गार्ड्स आणि फ्रंट फेंडर्ससह देखील येते. सर्व अपग्रेडसह ड्राय वेट 173kg इतकं आहे, जे V4S पेक्षा एक किलोने कमी आहे.

दरम्यान, या बाईकला देखील 1103 cc, Desmosedici Stradale इंजिनमधून पॉवर मिळते जे 13,000 rpm वर 211 Bhp आणि 9,500 rpm वर 124 Nm पीक टॉर्क जनरेट करते. मोटार 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. सस्पेंशन ड्यूटी हाफ अॅक्टिव्ह ओहलिन्स युनिटद्वारे कंट्रोल केली जाते. तर ब्रेकिंग परफॉर्मन्स टॉप-नॉच ब्रेम्बो युनिट्सवर अवलंबून आहे.

Ducati Panigale V4 SP सोबत ट्रॅक अॅक्सेसरीज देखील देत आहे, ज्यामध्ये ओपन कार्बन फायबर क्लच कव्हर, लायसन्स प्लेट रिमूव्हल प्लग आणि मशीन्ड मिरर ब्लॉक-ऑफ प्लेट्स समाविष्ट आहेत. डुकाटी डेटा अॅनालायजर + GPS मॉड्यूल देखील आहे. बाईक क्विकशिफ्टर, रायडिंग आणि पॉवर मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि इतर बऱ्याच अॅक्सेसरीज मिळतात.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Ducati Panigale V4 SP Motorcycle Launched in India, check Price and Features)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.