BMW G 310 RR: BMW च्या भन्नाट स्पोर्ट्स बाइकवर पोरं फिदा! किंमत सर्वात स्वस्त असल्याने बुकींगसाठी झुंबड

ही बाइक टीव्हीएस अपाचे आरआर या बाइकच्या प्लॅटफॉर्मवरच तयार केली आहे. या दोन्ही बाइक डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत सारख्याच आहेत. मात्र बीएमडब्ल्यूने यात बरेच बदलदेखील केले आहेत.

BMW G 310 RR: BMW च्या भन्नाट स्पोर्ट्स बाइकवर पोरं फिदा! किंमत सर्वात स्वस्त असल्याने बुकींगसाठी झुंबड
वनिता कांबळे

|

Jul 27, 2022 | 11:50 PM

मुंबई : बीएमडब्ल्यू या कंपनीचे नाव ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर लग्झरी कार आणि महागड्या स्पोर्ट्स बाइक येतात. कंपनी जगभर महागडी वाहने विकते. बीएमडब्ल्यू कंपनीच्या बाइक जगभरात विकल्या जातात. या बाइक सर्वांना आवडतात, परंतु या बाइक प्रीमियम रेंजमध्ये येत असल्यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग मर्यादित आहे. येतात. मात्र आता कंपनीने एक नवीन बाइक भारतीय बाजारात लाँच करून भारतीय ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने भारतीय बाजारात त्यांची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू जी 310 आरआर असे या स्पोर्ट्स बाइकचे नाव असून या बाइकची किंमत 2.85 लाख रुपये इतकी आहे. या बाईकची किंमत सर्वात स्वस्त असल्याने बुकींगसाठी( BMW G 310 RR booking start) झुंबड उडाली आहे.

ही बाइक टीव्हीएस अपाचे आरआर या बाइकच्या प्लॅटफॉर्मवरच तयार केली आहे. या दोन्ही बाइक डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत सारख्याच आहेत. मात्र बीएमडब्ल्यूने यात बरेच बदलदेखील केले आहेत.

पॉवरफुल इंजिन

या बाइकमध्ये कंपनीने 312.12 सीसी क्षमतेचे वॉटर कूल्ड सिंगल सिलेंडर, 4 व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे. हे इंजिन 34 पीएस पॉवर आणि 27.6 न्युटन मीटर पीक टॉर्क जनरेट करू शकते. या बाइकच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, ट्रॅक आणि स्पोर्ट्स मोडमध्ये ही बाइक 160 किमी प्रतितास आणि रेन आणि अर्बन मोडमध्ये 125 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावते.

हायटेक आणि स्मार्ट फीचर्स

या बीएमडब्ल्यू बाइकमध्ये सिंगल फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. यात ऑल एलईडी लायटिंग, रियर प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन, अपसाइड डाउन फोर्क सस्पेन्शन, रेडियल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह मोठा डिस्प्ले देण्यात आला. ही बाइक ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करतह येऊ शकते आणि बाइकच्या डिस्प्लेवर अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती पाहता येते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें