AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात
Maruti Suzuki Alto 800 VXI
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 04, 2021 | 10:53 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 VXI in just rs 195000 know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

2018 चं पेट्रोल मॉडल

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Alto 800 VXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2018 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 30450 किलोमीटरपर्यंत धावली आहे.

4 लाखांची कार 1.95 लाखात

या मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 3.95 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1 लाख 95 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 VXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-bhubaneswar-2018/AXiL4g9TNiwKO4z0JxFi) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

Maruti Alto 800 VXI चे फीचर्स

मारुती सुझुकीच्या या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 3.90 लाख रुपये इतकी आहे. कार सिल्की सिल्व्हर, ग्रॅनाइट ग्रे, मोजिटो ग्रीन, सरुलियन ब्लू आणि अपटाउन रेड अशा पाच रंगात उपलब्ध आहे.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा.)

इतर बातम्या

नवी कार खरेदी करण्यापूर्वी भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘या’ टॉप 10 गाड्या पाहा

मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम, कंपनीच्या विक्रीत कमालीची वाढ, या गाड्यांना आहे मागणी

(bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 VXI in just rs 195000 know more about it)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...