AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 हजारांची Honda Activa अवघ्या 25 हजारात, कुठे मिळतेय ऑफर?

तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही.

70 हजारांची Honda Activa अवघ्या 25 हजारात, कुठे मिळतेय ऑफर?
Honda Activa
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 11, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर खरेदी करु शकाल. (Buy Honda Activa in just 25000 rupees)

जर कोणी तुम्हाला असे सांगितले की, आपल्याला 70 हजार रुपये किंमत असलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर (Honda Activa) फक्त 25 हजार रुपयात मिळेल, तर तुम्ही निश्चितपणे थोडासे सावध व्हाल. परंतु यात धक्का बसण्यासारखे काहीही नाही, कारण आम्ही आपल्याला अशाच एका डीलबाबत सांगणार आहोत. वास्तविक, दुचाकी वाहनांमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हाची क्रेझ अद्याप अबाधित आहे, म्हणून नवीन किंवा जुन्या होंडा अ‍ॅक्टिव्हा या स्कूटरला नेहमीच मागणी असते. तसेच या स्कूटरला रिसेल व्हॅल्यूदेखील चांगली मिळते. चला तर मग या खास डीलबाबतची माहिती घेऊया.

काहींना Droom प्लॅटफॉर्मबद्दल माहिती असेलच, किंवा तुम्हाला याबाबत माहिती नसली तरी काळजी करु नका, आम्ही तुम्हाला त्याबद्दलही सांगणार आहोत. Droom हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे तुम्ही कार, स्कूटर आणि बाईक ऑनलाइन खरेदी करु शकता. या प्लॅटफॉर्मवर होंडा अ‍ॅक्टिव्हाची एक डील उपलब्ध आहे. ज्यात केवळ 25 हजार रुपयांमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर उपलब्ध आहे. ही एक दिल्लीतली फर्स्ट ओनर बाईक आहे.

110 सीसी ची स्कूटी

25 हजार रुपयांमध्ये विकली जाणारी ही होंडा अ‍ॅक्टिव्हा केवळ 18 हजार किलोमीटर धावली आहे. हे या स्कूटरचे 2013 चे मॉडेल आहे. ही एक 110 सीसी स्कूटर आहे. या स्कूटीचे मायलेज 55 Kmpl इतके सांगण्यात आले आहे. या स्कूटीच्या मॅक्स पॉवरबद्दल सांगायचे तर ते 8 बीएचपी असून चाकाचा आकार 10 इंचाचा आहे. या स्कूटीमध्ये ऑटो आणि किक स्टार्ट सुविधा आहेत. सेफ्टी फीचर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म, इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर डिटेल्स

या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक सिस्टम आहे. तर स्कूटरचा डायमेन्शन व्हीलबेस 1238 मिमी, रुंदी 710 मिमी, लांबी 1761 मिमी, उंची 1147 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 153 मिमी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की, जर तुम्ही सेकेंड हँड मार्केटमधून स्कूटी किंवा कोणतेही वाहन खरेदी करत असाल तर त्या वाहनाची कागदपत्रे नीट तपासून पाहा. ते वाहन चोरीचे तर नाहीये ना, याची खात्री करुन घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच व्यक्तीला पैसे द्या ज्याच्या नावावर आरसी नोंदणीकृत आहे. या व्यतिरिक्त वाहनाचे डेंट, इंजिन आणि आवश्यक वस्तू तपासून पहा. अशा वेळी सोबत एखाद्या मेकॅनिक मित्राला किंवा ओळखीच्या मेकॅनिकला घेऊन जाणं सर्वात उत्तम ठरेल.

(सूचना : या बातमीत संबंधित स्कूटरबद्दल दिलेली माहिती ही Droom वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात

(Buy Honda Activa in just 25000 rupees on Droom Platform)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!