Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण

Hero MotoCorp ने देशातील कोव्हिड -19 ची स्थिती पाहता अजून एक आठवडा देशातील त्यांचे सर्व प्लांट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण
Hero Motocorp

मुंबई : दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) देशातील कोव्हिड -19 ची स्थिती पाहता अजून एक आठवडा देशातील त्यांचे सर्व प्लांट्स (उत्पादन प्रकल्प) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिरोचे प्लांट्स 16 मे पर्यंत बंद राहतील. यामध्ये नीमराना येथील ग्लोबल पार्ट्स सेंटर (जीपीसी) आणि जयपूर येथील आर अँड डी प्लांट – सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी) यांचादेखील समावेश आहे. हिरो मोटोकॉर्पने जारी केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती दिली आहे. (Hero MotoCorp closes Manufacturing plants across India till 16 May due to Covid-19 crisis)

प्लांट बंद होणे म्हणजे उत्पादन थांबविणे, म्हणजेच कंपनी या कालावधीत वाहने तयार करणार नाही. कंपनीने गेल्या महिन्यात हरियाणा स्थित धारुहेडा आणि गुरुग्राम, आंध्र प्रदेशातील चित्तूर, उत्तराखंडमधील हरिद्वार, राजस्थानमधील नीमराना आणि गुजरातमधील हलोल या 6 मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्समधील कामकाज तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्याची घोषणा केली होती. या प्लांट्समध्ये दरवर्षी 90 लाखांहून अधिक दुचाकींची निर्मिती केली जाते.

परिस्थिती सुधारल्यानंतर काम सुरु होणार

हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि व्यवसायातील सातत्य राखण्याच्या योजनेसह तयार आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर लगेच कामकाज सुरू केलं जाईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनी त्यांचे उत्पादन बंद केले आहे. हिरो मोटोकॉर्पशिवाय अलीकडेच मारुती सुझुकी, होंडा आणि महिंद्रा या कंपन्यांनीही त्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरोची कोटींची उड्डाणं

हिरो मोटोकॉर्पने जोरदार विक्रीच्या आधारे 2020-21 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 885.28 कोटी रुपयांचा नफा कमावला. कंपनीने म्हटले आहे की 2019-20 च्या चौथ्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 613.81 कोटी रुपये इतका होता आणि त्यामुळे त्यांचा निव्वळ नफा 44 टक्क्यांनी वाढला. हीरो मोटोकॉर्पने नियामक नोटीसमध्ये म्हटले आहे की, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकूण महसूल 8.689.74 कोटी रुपये झाला होता, त्या तुलनेत मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत त्यांचा एकूण महसूल 6,333.89 कोटी रुपये इतका होता.

कंपनीने म्हटले आहे की, मागील तिमाहीत त्यांनी एकूण 15.68 दुचाकींची विक्री केली आहे, तर 2019-20 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 13.23 लाख वाहने विकली होती. अशा प्रकारे, त्यांची विक्री 18.5 टक्क्यांनी वाढली. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण निव्वळ नफा 2,936.05 कोटी रुपये इतका होता, तर 2019-20 या आर्थिक वर्षात तो 3,659.41 कोटी रुपये इतका होता, म्हणजे कंपनीच्या निव्वळ नफ्यात 20 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न 30,959.19 कोटी होते, मागील आर्थिक वर्षात हाच निव्वल नफा 29,255.32 कोटी रुपये इतका होता.

संबंधित बातम्या

55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द

(Hero MotoCorp closes Manufacturing plants across India till 16 May due to Covid-19 crisis)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI