AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 25 हजारात घरी न्या Honda Activa, स्कूटर पसंत न पडल्यास पैसे परत

होंडा अॅक्टिव्हा स्कूटरची देशात सर्वाधिक विक्री झाली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळते.

अवघ्या 25 हजारात घरी न्या Honda Activa, स्कूटर पसंत न पडल्यास पैसे परत
होंडा अॅक्टिव्हा ते टीव्हीएस एनटॉर्कपर्यंत सप्टेंबर 2021 मधील 'या' आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 01, 2021 | 6:43 PM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. Honda Activa असे या स्कूटरचे नाव आहे. (buy Honda Activa in just rs 25000, will get 1 year warranty too)

ही सेकंड हँड अॅक्टिव्हा 109 सीसी इंजिनसह येते. पेट्रोल व्हेरिएंट स्कूटर 55 किलोमीटरचे मायलेज देते. याची क्षमता 5 लीटर पेट्रोल टाकीची आहे. ही स्कूटर 7500 आरपीएमवर 8 बीएचपी पॉवर, तर 5500 आरपीएमवर 9 एनएम टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही पहिली ऑनर स्कूटर आहे.

होंडा अॅक्टिव्हा स्कूटरची देशात सर्वाधिक विक्री झाली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त आरामासह उत्तम मायलेज मिळते. ही स्कूटर जर तुम्ही शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला 69,080 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, आजच्या ऑफरमध्ये, तुम्ही ही स्कूटर फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.

या स्कूटरवरील ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, CARS24 च्या वेबसाइटला भेट देऊन आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. ही वेबसाइट सेकेंड हँड वाहनांची विक्री करते. येथे तुम्हाला अॅक्टिवा लिस्टेड असल्याचे पाहायला मिळेल. ज्याची किंमत 25 हजार रुपये आहे. स्कूटर खरेदी केल्यावर तुम्हाला इथे एक वर्षाची वॉरंटीही मिळते. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीदेखील मिळते. जर तुम्हाला स्कूटर आवडली नाही तर तुम्ही ती 7 दिवसांच्या आत परत करू शकता आणि तुमचे सर्व पैसे परत मिळवू शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात

(buy Honda Activa in just rs 25000, will get 1 year warranty too)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा