Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Sep 27, 2021 | 6:54 PM

यामाहा मोटर्स इंडियाने (Yamaha Motor India) अलीकडेच भारतात न्यू जनरेशन मोटरसायकल Yamaha ZF-R15 V4 लाँच केली आहे. या स्पोर्ट्स मोटारसायकलसोबतच कंपनीने Aerox 155 स्कूटरही सादर केली.

Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

मुंबई : यामाहा मोटर्स इंडियाने (Yamaha Motor India) अलीकडेच भारतात न्यू जनरेशन मोटरसायकल Yamaha ZF-R15 V4 लाँच केली आहे. या स्पोर्ट्स मोटारसायकलसोबतच कंपनीने Aerox 155 स्कूटरही सादर केली. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसातच कंपनीने आपल्या नवीन स्पोर्ट्स मोटारसायकलची डिलिव्हरी देखील सुरू केली आहे. या मोटरसायकलची प्राईस रेंज 1,67,800 ते 1,79,800 रुपयांच्या दरम्यान आहे, जी एक्स-शोरूम किंमत आहे. ही मोटारसायकल जुन्या व्हर्जनपेक्षा 10 हजार रुपये अधिक महाग आहे. (Delivery of Yamaha YZF-R15 V4 begins, know what’s special about new motorcycle?)

Yamaha ZF-R15 V4 मध्ये नवीन अपडेट्स

Yamaha ZF-R15 V4 मोटारसायकल पाच वेगवेगळ्या रंगात येते. यामाहाने भारतात न्यू जनरेशन मॉडेल अनेक अपडेट्ससह सादर केले आहे. नवीन मोटारसायकलला ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) तसेच क्विक शिफ्टरसह अनेक अपग्रेडेड फीचर्स मिळतात. सहसा ही वैशिष्ट्ये फक्त हाय आणि प्रीमियम सुपरबाईक्समध्येच दिसतात.

Yamaha ZF-R15 V4 चे फीचर्स

या मोटारसायकलच्या इतर महत्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, त्यात अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यामाहा मोटरसायकल कनेक्ट आणि गिअर शिफ्ट इंडिकेटर आहे. यासह, YZF-R1 हून प्रेरित एक नवीन LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ट्रॅक आणि स्ट्रीट मोडचा समावेश आहे. जे बाईकला अधिक स्टायलिश बनवतात. मोटारसायकलला 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात जे एकाच डिस्कशी जोडले जातात.

Yamaha ZF-R15 V4 चं इंजिन

यामाहाच्या या स्पोर्ट्स मोटरसायकलला 155 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सिंगल सिलिंडर आहे आणि त्याला लिक्विड कूल आणि 4-व्हॉल्व्ह इंजिन मिळते. हे इंजिन 10,000 rpm वर जास्तीत जास्त 18.4 PS ची पॉवर आणि 7,500 rpm वर 14.2 Nm पीक टॉर्क निर्माण करते. फ्यूल-इंजेक्टेड मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

Yamaha ZF-R15 V4 चं डिझाईन

यामाहाच्या या मोटारसायकलच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर त्यात पूर्ण नवीन डिझाईन देण्यात आले आहे. हे डिझाईन Yamaha YZF-R7 पासून प्रेरित दिसते. कंपनीने ही मोटारसायकल फ्रंटला अशा प्रकारे डिझाईन केली आहे की, त्याला मोठ्या बाईकचे स्वरूप आणि उत्तम एरोडायनामिक्स देता येईल.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(Delivery of Yamaha YZF-R15 V4 begins, know what’s special about new motorcycle?)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI