धमाकेदार ऑफर! 2 लाखाहून कमी किंमतीत Maruti Wagon R खरेदीची संधी

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

धमाकेदार ऑफर! 2 लाखाहून कमी किंमतीत Maruti Wagon R खरेदीची संधी
Maruti Wagonr Car (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 11:33 AM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (buy Second hand Maruti WagonR car in 1.99 lakh rupees, know about deal)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

मारुतीची वॅगन आर कार अनेकांना आवडते. तसेच या कारला चांगले मायलेजदेखील मिळते आणि लहान कुटुंबासाठी हा एक चांगला पर्याय आहे. सध्या या कारची किंमत 5.25 लाख रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका खास डीलबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ही कार 2 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता.

हे Maruti Wagon R VXI मॉडेल आहे आणि BS 4 इंजिनवर काम करते. ही कार सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 998 सीसी इंजिन आहे, जे 67.1 बीएचपी पॉवर जनरेट करू शकते. यात एअरबॅग्जदेखील आहेत.

Maruti WagonR वर मिळत असलेल्या डीलबद्दल तपशीलवार जाणून घेण्यापूर्वी, आधी या कारबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. ही कार 2011 चे मॉडेल आहे आणि पेट्रोलवर चालते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. एअरबॅगसह येणारी ही कार हरियाणाच्या HR26 RTO मध्ये रजिस्टर आहे.

मारुती वॅगनआर ही सेकंड हँड सेगमेंट कार असून तिने 1.11 लाख किमी अंतर कापले आहे. कार देखो वेबसाइटवर अपलोड केलेल्या इमेजमध्ये कार चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येते. ही फर्स्ट ओनर कार आहे.

मारुती वॅगनआर कार 1,99,000 रुपयांमध्ये लिस्टेड आहे आणि वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ती फक्त 5,100 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. वेबसाइटवर होम डिलिव्हरीचा पर्याय देखील देण्यात आला आहे, जो खूप उपयुक्त ठरू शकतो. यावर काही अटींसह वॉरंटी आणि कॅशबॅकचा पर्यायही दिला जात आहे, जो ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही कार देखो वेबसाईटवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

(buy Second hand Maruti WagonR car in 1.99 lakh rupees, know about deal)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.