Adventure Bike : अॅडव्हेंचर बाइक खरेदीच्या विचारात आहात? ‘या’ पाच बजेट बाइकचा विचार नक्की करा…

हिरो एक्सपल्स 200 भारतामधील सर्वाधिक स्वस्त अॅडव्हेंचर बाइक आहे. युझर्सला यामध्ये 199.6 सीसी एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळणार आहे. ही बाईक 5 स्पीड ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. ही मोटरसायकल उत्तम ऑफ-रोड क्षमतेसह उपलब्ध आहे.

Adventure Bike : अॅडव्हेंचर बाइक खरेदीच्या विचारात आहात? ‘या’ पाच बजेट बाइकचा विचार नक्की करा...
अॅडव्हेंचर बाइक (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Jun 27, 2022 | 7:13 PM

भारतात मागील काही वर्षांपासून अॅडव्हेंचर-टुरिंग सेगमेंटमध्ये अनेक बदल झालेले आहेत. हे बदल व ग्राहकांचा वाढता कल पाहून काही दुचाकी निर्मात्या कंपन्यांनी आपल्या विविध अॅडव्हेंचर बाइक्स लाँच केल्या आहेत. खासकरून युवकांमध्ये डोंगरी भागांमध्ये अॅडव्हेंचर बाइकच्या रायडिंगबाबत (Riding) खास आकर्षण दिसून येत आहे. मार्केटमध्ये अनेक ऑफ-रोड अॅडव्हेंचर बाइक (Adventure Bike) उपलब्ध आहेत. परंतु अनेकांची किंमत आवाक्याबाहेर असते. त्यामुळे त्यांना खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. जर तुम्ही देखील अशा रायडिंगचे शौकिन असाल आणि अॅडव्हेंचर बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही या लेखातून तुम्हाला बजेट अॅडव्हेंचर बाइक्सची माहिती देणार आहोत. रॉयल एनफील्ड हिमालयनपासून (Royal Enfield Himalayan) ते हिरो एक्सपल्स 200 यासारख्या अनेक बाइक्सचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे.

हिरो एक्सपल्स 200

हिरो एक्सपल्स 200 भारतामधील सर्वाधिक स्वस्त अॅडव्हेंचर बाइक आहे. युझर्सला यामध्ये 199.6सीसी एअर/आइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळणार आहे. ही बाइक 5 स्पीड ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. ही मोटरसायकल उत्तम ऑफ-रोड क्षमतेसह उपलब्ध आहे. हिरोची अॅडव्हेंचर बाइकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1.23-1.32 लाख रुपये आहे.

होंडा सीबी 200 एक्स

ही होंडाची एंट्री लेव्हल अॅडव्हेंचर टूरिंग बाइक आहे. या बाइकचे पावरट्रेन एक स्ट्रीटफाइटर बाइकसारखे असून त्यात 184.4 सीसी एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. ही बाइक 5 स्पीड ट्रांसमिशनसह बाजारात उपलब्ध आहे. बाईकमध्ये ऑन रोडशिवाय ऑफ रोड देखील सुविधा आहेत. याची सुरुवातीची किंमत 1.46 इतकी आहे.

येझदी अॅडव्हेंचर

येझदी अॅडव्हेंचरला या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले आहे. ही बाइक महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लेजेंडचे एक क्लास प्रोडक्ट आहे. यात, 334सीसीचे लिक्विड-कूल्ड इंजिन मिळणार आहे. ही अॅडव्हेंचर बाइक 6 स्पीड ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. बाइकची एक्स शोरूम किंमत 2.10 ते 2.19 लाख रुपयांपर्यंत आहे.

सुझुकी व्ही-स्टार्म एसएक्स

सुझुकीची ही लेटेस्ट अॅडव्हेंचर बाइक आहे. यात 249 सीसीचे ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळणार आहे. ही बाइक 6 स्पीड ट्रांसमिशनसह उपलब्ध होणार आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत 2.12 लाख रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

रायल एनफील्ड हिमालयन

रायल एनफील्ड हिमालयन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅडव्हेंचर बाइक आहे. एनफील्डच्या या बाइकमध्ये 411 सीसी एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. ही बाइक 5 स्पीड ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. रेट्रो लूकसह चांगली डिझाइन देण्यात आली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.15 ते 2.22 लाखांपर्यंत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें