AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bike : केटीएमने लाँच केली नवीन ॲडव्हेंचर बाइक…काय आहे खास जाणून घ्या…

केटीएम 390 ॲडव्हेंचर बाइकमध्ये 373.2 सीसीचे लिक्विड कूल्स, सिंगल सिलेंडर इंजीन देण्यात आले आहे. हे इंजीन 43.5 पीएसची पॉवर आणि 37 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करु शकणार आहे.

Bike : केटीएमने लाँच केली नवीन ॲडव्हेंचर बाइक...काय आहे खास जाणून घ्या...
KTM Bike
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 10:42 AM
Share

मुंबई : केटीएमने (KTM) भारतीय दुचाकी बाजारात आपली एक नवीन बाइक (bike) आणली आहे. या बाइकचे नाव 2022 केटीएम 390 ॲडव्हेंचर आहे. या नवीन मॉडेलमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. यात नवीन कंट्रोल्स आणि नवीन कलर थीम देखील देण्यात आली आहे. या नवीन मॉडेलची किंमत जुन्या बाईकसारखीच आहे. कंपनीने 2022 केटीएम 390 ॲडव्हेंचरची (2022 ktm 390 adventure) किंमत 3.28 लाख रुपये ठेवली आहे. या बाइकची बुकिंगदेखील सुरु करण्यात आली आहे. ही बाइक तुम्ही केटीएमच्या अधिकृत डिलरकडे जाउन बूक करु शकणार आहोत.

नव्या बाईकमध्ये नाविन्यपूर्ण बदल

2022 केटीएम 390 ॲडव्हेंचर मॉडलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या बाईकच्या वैशिष्ट्यांमध्ये अधिक भर पडली आहे. नवीन बाइक ब्लू आणि डार्क गलवानो ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. ऑस्टियन ऑटोने ट्रेक्शन ऑटो कंट्रोल्स सिस्टीमसाठी दोन मोडला समाविष्ट केले असून त्याचे नाव स्ट्रीट अँड ऑफ रोड असे आहे. ऑफरोडच्या मदतीने युजर्सचे जर रियर व्हील स्लिप झाले तर राइडर्सला आपली बाइक कंट्रोल करणे सोपे जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रेक्शन कंट्रोल सिस्टीम डिफाल्ट सेटिंगमध्ये परत जाणार नाही. सोबतच इंजीनला जेव्हा आपण बंद करु तेव्हा ते आपल्या डिफाल्ट सेटिंग्समध्ये येणार असल्याने हा एक चांगले फीचर्स बाइकसोबत मिळणार आहे.

मॉडेलच्या गुणवत्तेमध्येही वाढ

कंपनीने नवीन मॉडलमध्ये नवीन अलॉय व्हील्सचाही वापर केला आहे. यात पाच स्पोक आर्किटेक्चरचा वापर करण्यात येणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, नवीन व्हील्स जुन्या व्हील्सच्या तुलनेत हलके आहेत. आणि ते जुन्या व्हील्सपेक्षा चांगले गुणवत्तापूर्ण आहेत. ब्रेकींग सिस्टीमबाबत बोलायचे झाल्यास दोन्ही ठिकाणी व्हील्सवर सिंगल डिस्क सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. समोरच्या बाजूला 320 एमएमचे ब्रेक देण्यात आले आहे. रियर साइटवर 230 एमएमचे डिस्क वापरण्यात आले असून त्यासोबत स्विचेबर ड्युअल चेनल एबीएस सिस्टीम देण्यात आली आहे. केटीएम 390 ॲडव्हेंचर बाइकमध्ये 373.2 सीसीचे लिक्विड कूल्स, सिंगल सिलेंडर इंजीन देण्यात आले असून हे इंजीन 43.5 पीएसची पॉवर आणि 37 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करुन शकणार आहे. ही बाइेक 6 स्पीड सिक्वेंशनल ट्रांसमिशनसोबत येणार आहे.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.