AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Innova Crysta | काय सांगता.. Innova Crysta खरेदीवर तब्बल 55 हजारांची मेगा बचत

Innova Crysta | इनोव्हा क्रिस्टाचे लिमिटेड एडिशन फक्त पेट्रोल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. सध्या, टोयोटाने इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल प्रकारांचे बुकिंग थांबवले आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या लिमिटेड एडिशन ऑफरअंतर्गत, मोफत अॅक्सेसरीज सारखे सर्व फायदे डीलर स्तरावर दिले जात आहेत.

Innova Crysta | काय सांगता.. Innova Crysta खरेदीवर तब्बल 55 हजारांची मेगा बचत
बुकींगवर मेगा बचत Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 02, 2022 | 11:19 AM
Share

Innova Crysta | जपानी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने इनोव्हा क्रिस्टलची (Innova Crysta) लिमिटेड एडिशन बाजारात आणली आहे. इनोव्हा क्रिस्टाची लिमिटेड एडिशन (Limited Edition) खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. टोयोटा नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये डीलर स्तरावर अनेक मोफत अॅक्सेसरीज (Accessories) ऑफर करत आहे. कंपनी आधीच नवीन ग्राहकांसाठी 55,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत देत आहे. इनोव्हा क्रिस्टाची लिमिटेड एडिशन GX पेट्रोल प्रकारावर आधारित आहे. रिपोर्ट्सनुसार, इनोव्हा क्रिस्टा लिमिटेड एडिशनच्या मॅन्युअल व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 19.02 लाख रुपये आहे.

55 हजारांची बचत

इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल व्हर्जनच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी टोयोटाने ही ऑफर आणली आहे. कंपनी नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये डीलर स्तरावर 55,000 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत देईल. या अॅक्सेसरीज इनोव्हा क्रिस्टाच्या GX प्रकारात वेगळ्या किमतीत उपलब्ध आहेत. टोयोटा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TMPS), फोनसाठी वायरलेस चार्जिंग आणि मोफत अॅक्सेसरीजचा भाग म्हणून नवीन ग्राहकांना हेड-अप डिस्प्ले देईल.

कधी मिळेल कार?

कंपनी मोफत अॅक्सेसरीजसह इनोव्हा क्रिस्टलची लिमिटेड एडिशन प्रदान करेल. ऑटोकार इंडियाच्या ऑटो वेबसाइटनुसार, कंपनी केवळ ऑक्टोबरपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत मोफत अॅक्सेसरीजसह इनोव्हा क्रिस्टल देऊ शकते. सध्या टोयोटाने इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल आवृत्तीचे बुकिंग बंद केले आहे. दरम्यान, कंपनीने सांगितले आहे, की ज्या ग्राहकांना आधीच कार अलॉट झाले आहे त्यांना डिलिव्हरी मिळेल.

इनोव्हा हायक्रॉस नोव्हेंबरमध्ये येणार

टोयोटा देखील इनोव्हाचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, कंपनी या वर्षी नोव्हेंबरमध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे जागतिक पदार्पण करू शकते. आगामी इनोव्हा हाय क्रॉस इनोव्हा क्रिस्टा सोबत विक्रीसाठी जाईल. नवीन इनोव्हा हायक्रॉस ही एमपीव्ही असू शकते. त्याच्या किमती पुढील वर्षी जानेवारीमध्ये जाहीर केल्या जाऊ शकतात.

क्रिस्टा डिझेलचे बुकींग बंद

टोयोटाने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटची बुकिंग अचानक बंद केली आहे.   ग्राहकांकडून जास्त प्रतिसाद मिळाला. जास्त  मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली.  याविषयीची माहिती टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने दिली आहे. आधीच बुकिंग करुन ठेवण्यात आलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट जास्त असल्याने त्यांची पूर्तता करणे अवघडत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित गाड्यांची आकडेवारी कमी करुन पुढील बुकिंग घेण्यात येणार असल्याचे समजते.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.