टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरियंटची बुकिंग बंद… काय आहे नेमकं कारण?

टोयोटाने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटची बुकिंग अचानक बंद केली आहे. याबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले, की जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. आधीच बुकिंग करुन ठेवण्यात आलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट जास्त असल्याने त्यांची पूर्तता करणे अवघडत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित गाड्यांची आकडेवारी कमी करुन पुढील बुकिंग घेण्यात येणार असल्याचे समजते.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरियंटची बुकिंग बंद… काय आहे नेमकं कारण?
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 2:47 PM

मुंबईः टोयोटाने (Toyota) त्यांच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या MPV कार इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) डिझेल व्हेरिएंटची बुकिंग तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटाने या निर्णयामागे खास कारणही सांगितले आहे. कंपनीने नुकतीच अधिकृत माहिती दिली असली, तरी कंपनी असा निर्णय घेण्याच्या विचारात आहे, हे आधीच उघड झाले होते. आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर करताना, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले की, जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल व्हेरियंटचे (petrol variant) बुकिंग सुरू झाली असून सर्वात पहिले बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना पहिले प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

टोयोटाने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटची बुकिंग अचानक बंद केली आहे. याबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले, की जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. आधीच बुकिंग करुन ठेवण्यात आलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट जास्त असल्याने त्यांची पूर्तता करणे अवघडत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित गाड्यांची आकडेवारी कमी करुन पुढील बुकिंग घेण्यात येणार असल्याचे समजते.

इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे फीचर्स

टोयोटा आपल्या इनोव्हा क्रिस्टामध्ये 150hp 2.4 लिटर इंजिन देत आहे. त्यात, पाच स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे. पेट्रोल व्हर्जनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 2.7 लीटर इंजिन असून ते 166hp पॉवर जनरेट करते. 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक देण्यात आले आहे.

इनोव्हा हायक्रॉसची एंट्री

रिपोर्टनुसार, कंपनी आपली नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या माध्यमातून कंपनी हायक्रॉसचे ग्लोबली डेब्यु करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑटोकार वेबसाइटनुसार, हे इनोव्हा क्रिस्टलचे अडिशनल मॉडेल असेल. ही नवीन MPV पेट्रोल-हायब्रिड इंजिन पर्यायासह लॉन्च केली जाऊ शकते. टोयोटा प्रमाणेच Hyrider देखील लॉन्च करणार आहे. Hyrider चे डिझेल व्हेरियंट देखील अपेक्षित आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.