AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu-Kashmir: शोपियान जिल्ह्यात 2 वर्षात150 दहशतवाद्यांना कंठस्नान; पोलीस-सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; एलईटीकडून सतत कारस्थानं

जम्मू-काश्मीरचा विचार केल्यास संपूर्ण खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या वर्ष 2022 मध्ये सुरक्षा दलांकडून पहिल्या 6 महिन्यांत म्हणजेच 30 जूनपर्यंत 125 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कालावधीत 172 दहशतवादी आणि संशयितांना पकडण्यात आले आहे.

Jammu-Kashmir: शोपियान जिल्ह्यात 2 वर्षात150 दहशतवाद्यांना कंठस्नान; पोलीस-सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; एलईटीकडून सतत कारस्थानं
| Updated on: Aug 31, 2022 | 2:24 PM
Share

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांविरोधात पोलीस आणि सुरक्षा दलांची कारवाई गेल्या कित्येक दिवसांपासून सुरूच आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीबरोबर त्यांचा खात्माही करण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे की, गेल्या अडीच वर्षांत एका शोपियान जिल्ह्यात 150 दहशतवाद्यांना (150 terrorist killed )कंठस्नान घालण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत शोपियान (Shopian) जिल्ह्यातच 150 दहशतवादी मारले गेल्याने तेथील दहशतवाद्यांची संख्या आता रोडावली आहे. आणि इथून पुढं जरी त्यांच्याबरोबर सामना करावा लागला असला तरी सफरचंदाच्या बागेतील झाडांची पानगळती सुरु होऊल त्यावेळी त्यांच्याबरोबर युद्ध करणे आणखी सोपे जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, शोपियान जिल्ह्यात आता खूप कमी दहशतवादी आहेत. आता त्यांच्याबरोब युद्ध नसलं तरी सफरचंदाच्या बागेतील पानं झडली जातात तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर सामना करणं सोपं जातं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शोपियानमध्ये 3 दहशतवादी ठार

यापूर्वी विजय कुमार यांनी शोपियान चकमकीबद्दल बोलताना सांगितले की, येथील सुरक्षा दलाला शोपियान प्रातांत 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या भागात तीन दहशतवादी घुसल्याचे कळताच पोलीस आणि सुरक्षा दलांकडून त्यांना घेराव घालण्यात आला, त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षादलात जोरदार चकमक सुरू झाली. या कारवाईत तीनही स्थानिक दहशतवादी मारले गेले. ठार झालेला दहशतवादी दानिश भट्ट हा दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कर-ए-तैयबा

याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारण्यात आले होते. शोपियानच्या नागबल भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाकडून घेराव घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली.

तिन्ही दहशतवादी लष्कराशी संबंधित

दहशतवादाविरोधात ऑपरेशन सुरू करण्यात आल्यानंतर त्या कारवाईत सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी याबद्दल ट्विट केले होते की, “लष्कर-ए-तैयबाचा दानिश खुर्शीद भट, तन्वीर वानी आणि तौसीफ भट अशी तीन ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत, आणि त्यांची ओळख पटली आहे. दहशतवादाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. शोपियानमध्ये तरुणांना दहशतवादाकडे नेण्यात दानिशचा मोठा हात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.

सहा महिन्यात 125 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरचा विचार केल्यास संपूर्ण खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या वर्ष 2022 मध्ये सुरक्षा दलांकडून पहिल्या 6 महिन्यांत म्हणजेच 30 जूनपर्यंत 125 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कालावधीत 172 दहशतवादी आणि संशयितांना पकडण्यात आले आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.