AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Tracing : कार चोरीचे नो टेन्शन! चोरटे रंगेहाथ पकडले जाणार, केंद्र सरकारचा काय आहे जबरा प्लॅन

Car Tracing : दरवर्षी देशात हजारो कार लंपास होतात. पार्किंगमधून कार चोरी होतात. पण त्याचा लवकर काही थांगपत्ता लागत नाही. या कारचे पार्टस करुन ते विक्री होतात. पण आता लवकरच केंद्र सरकार या चोरांना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. काय आहे जबरदस्त योजना

Car Tracing : कार चोरीचे नो टेन्शन! चोरटे रंगेहाथ पकडले जाणार, केंद्र सरकारचा काय आहे जबरा प्लॅन
| Updated on: Apr 05, 2023 | 6:52 PM
Share

नवी दिल्ली : कार मालकांसाठी चांगली बातमी आहे. जर तुमची चार चाकी चोरीला गेली तर ही कार परत तुम्हाला मिळू शकते. रवर्षी देशात हजारो कार लंपास होतात. पार्किंगमधून कार चोरी होतात. पण त्याचा लवकर काही थांगपत्ता लागत नाही. या कारचे पार्टस करुन ते विक्री होतात. पण आता लवकरच केंद्र सरकार या चोरांना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी केंद्र सरकार खास ट्रॅकिंग सिस्टमवर (Stolen Car Tracking System) काम करत आहे. त्यामुळे चोरी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तिचा तपास सुरु होईल. यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने एक प्रस्ताव पण तयार केला आहे. देशात वर्षाला जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. त्यामुळे हा केंद्र सरकार (Central Government) यावर गांभीर्याने विचार करत आहे.

2.5 लाख कार चोरी

देशात दरवर्षी जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. या आकडेवारीवरुन तुम्हाला याचे गांभीर्य लक्षात येईल. सर्वाधिक वाहन चोरी तीन राज्यात होते. त्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. दिल्लीत जवळपास 38 हजार, उत्तर प्रदेशमध्ये 34 हजार, महाराष्ट्रात जवळपास 22 हजार कार चोरी जातात. पोलीस यामधील केवळ 400 कारचा शोध लावण्यात यशस्वी होतात.

अत्याधुनिक यंत्रणा कामाला

देशात वर्षाला जवळपास 2.5 लाख कार चोरी होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, एंटी थेफ्ट डिव्हायसेस आणि इतर आयुधे असतानाही चारचाकीची चोरी होते. विक्री होते. मुळ मालकाला त्याची कार कधीच परत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आता अत्याधुनिक यंत्रणा वापरणार आहे. त्यासाठी ट्रॅकिंग सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कार चोरीला जाताच पोलीस ही कार तात्काळ शोधू शकतील.

विविध विभाग मदतीला

नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटीने (NCCS) वाहनांच्या ट्रॅकिंगसाठी अत्याधुनिक यंत्र तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव टेलिकम्युनिकेशन सिक्युरिटी इन्शुरन्सने (ITSAR) तयार केला आहे. याप्रकरणी 21 एप्रिलपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. हे अत्याधुनिक यंत्र तयार करण्यासाठी कंपन्या, ॲप्लिकेशन सेवा पुरवठादार आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला मागविण्यात आला आहे.

काम अति जलद

ही सिस्टम अत्यंत जलद प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे कार चोरीचा एफआयआर फाटल्यानंतर लागलीच कार शोधण्याची प्रक्रिया अति जलद सुरु करण्यात येईल. नवीन वाहन ट्रेकिंग डिव्हाईस ग्लोबल नेव्हिगेशन सेटेलाईट सिस्टिमचा (GNSS) वापर करणार आहे. त्यामुळे तात्काळ वाहनाची सद्यस्थितीची माहिती समोर येईल.

बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.