Ola सोबत जोडा तुमची बाईक आणि कमवा पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

| Updated on: Jan 27, 2021 | 5:05 PM

मुंबई : आता तुम्ही तुमच्या कारप्रमाणेच तुमची बाईकही Ola सोबत जोडू शकता. आता बाईक रायडर्सची मागणी वाढत आहे आणि तुम्ही तुमची बाईक Olaशी जोडून चांगले पैसे कमवत आहे. तुमच्याकडेही बाईक आहे तर तुम्हीही Ola सोबत बाईक जोडून तुमचा खर्च भागवू शकता. सध्या बाईक ट्रिपचे ग्राहक वाढले आहेत. त्यामुळे Ola सोबत बाईक जोडली तरी ग्राहकांची कमतरता […]

Ola सोबत जोडा तुमची बाईक आणि कमवा पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
Follow us on

मुंबई : आता तुम्ही तुमच्या कारप्रमाणेच तुमची बाईकही Ola सोबत जोडू शकता. आता बाईक रायडर्सची मागणी वाढत आहे आणि तुम्ही तुमची बाईक Olaशी जोडून चांगले पैसे कमवत आहे. तुमच्याकडेही बाईक आहे तर तुम्हीही Ola सोबत बाईक जोडून तुमचा खर्च भागवू शकता. सध्या बाईक ट्रिपचे ग्राहक वाढले आहेत. त्यामुळे Ola सोबत बाईक जोडली तरी ग्राहकांची कमतरता भासणार नाही. Ola सोबत बाईक जोडण्यासाठी तुम्हाला कुठलिही गुंतवणूक करावी लागणार नाही. या माध्यमातून अनेक लोक पार्टटाईम पैसे कमवत आहेत. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ते जाणून घेऊया.(chance to make money by connecting your bike with Ola)

Ola सोबत कशाप्रकारे बाईक जोडता येईल?

Olaने आपल्यासोबत व्यवसाय करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक वेबसाईट partners.olacabs.com बनवली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमची कार, टॅक्सी जोडण्याबाबत माहिती मिळवू शकता. तसंच या वेबसाईटच्या माध्यमातूनच तुम्ही अर्जही करु शकता. कंपनीनं या वेबसाईटवर कार, टॅक्सी जोडण्याबाबत सर्व माहिती दिली आहे. याच वेबसाईटवर बाईक जोडण्याबाबतही तुम्ही अर्ज करु शकता.

Ola ने अद्याप बाईक आणि ई-रिक्षा जोडण्यासाठी कुठलीही स्वतंत्र लिंक दिलेली नाही. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आपली क्वेरी सबमिट करावी लागले. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी तुमच्याशी संवाद साधतील. कारसाठी स्वतंत्र अप्लाय लिंक दिली आहे पण बाईकसाठी अप्लाय करण्याची प्रक्रिया वेगळी आहे.

प्रक्रिया काय?

वेबसाईटवर क्वेरी सबमिट करण्याचा ऑप्शन निवडल्यानंतर एक फॉर्म मिळेल. तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्यात तुम्हाला बाईक किंवा ई-रिक्षाची निवड करावी लागेल आणि तुमची बाईक जोडण्याबाबत लिहावं लागेल. त्यानंतर तुमची माहिती भरुन तो फॉर्म ऑनलाईन सबमिट करा. त्यानंतर Olaकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?

यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, कॅन्सल चेक किंवा पासबूक, आधार कार्ड, पत्ता याची आवश्यकता लागेल. त्यासह गाडीचं आरसी बूक, परवाना, इंन्शूरन्सही द्यावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हरचे कागदपत्रही द्यावे लागतील. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि अॅड्रेस प्रुफचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

बजाजची ‘ही’ बाईक फक्त 7 हजार रुपयांमध्ये मिळणार, जाणून घ्या कुठे? कशी?

बहुप्रतीक्षित 2021 KTM 890 Duke लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

chance to make money by connecting your bike with Ola