बहुप्रतीक्षित 2021 KTM 890 Duke लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

2021 KTM 890 ड्युक ही बहुप्रतीक्षित बाईक लवकरच भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे.

बहुप्रतीक्षित 2021 KTM 890 Duke लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अक्षय चोरगे

|

Jan 26, 2021 | 7:58 PM

मुंबई : 2021 KTM 890 ड्युक लवकरच भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे. 890 ड्युक पहिल्यांदा 2020 मध्येच सादर करण्यात आली होती. 790 ड्युक जगभरात बंद केल्यानंतर आता केटीएम कंपनीकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की, 890 ड्युक लवकरच भारतात लाँच केली जाईल. लाँचिंगनंतर ही बाईक केटीएम नेकेड मिडलवेट लाइनअपचा हिस्सा बनेल. (2021 KTM 890 Duke soon to be launched in india, here are the top features and other details)

डिझाईन आणि स्टायलिंगबाबत बोलायचे झाल्यास ड्यूक 890 बाईक ही 890 R प्रमाणेच आहे. यामध्ये केवळ नवीन रंग आणि ग्राफिक्सचा समावेश केला जाणार आहे. या बाईकमध्ये शार्प लाइन्स, अँग्युलर एलईडी हेडलाईट, चिसल्ड फ्युल टँक आणि स्टेप सीट्स दिले जाऊ शकतात.

या मोटारसायकलला स्पोर्टी फील देण्यासाठी क्रोमियम Molybdenum स्टील फ्रेमवर अॅल्युमिनियम सबफ्रेमसह ही बाईक तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला LC8 पॅरेलल ट्वीन इंजिन मिळतील जे 889cc क्षमतेचे आहेत. हे इंजिन 113 bhp पॉवर आणि 92 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये तुम्हाला 300mm चे डिस्क अप मिळतात. बाईकमध्ये कॉन्टिनेंटल कॉन्टिरोड टायर दिले गेले आहेत.

बाईक स्ट्रीट, रेन, स्पोर्ट आणि ऑप्शनल ट्रॅक मोडसह सादर केली जाणार आहे. या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस, कॉर्निंग एबीएस, व्हीली कंट्रोलसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक लवकरच लाँच केली जाऊ शकते, या बाईकची अंदाजे किंमत 9.5 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

KTM आणि Husqvarna ने मोटारसायकल्सच्या किंमती वाढवल्या

केटीएम (KTM) आणि हुस्कवार्नाने (Husqvarna) त्यांच्या बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नव्या किंमती 4 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात आल्या आहेत. बाईक्सच्या किंमतीत 1,466 रुपये ते 4,485 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. KTM 390 अॅडव्हेंचरच्या किंमतीत सर्वाधिक 4,485 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आता 3.10 लाख रुपये झाली आहे.

KTM 390 च्या किंमतीत एक महिन्यापूर्वी 1,447 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच केटीएमची सर्वात छोटी मोटारसायकल केटीएम 125 आरसीच्या किंमतीत करण्यात आलेली वाढ सर्वात कमी आहे. या बाईकच्या किंमतीत 1 हजार 466 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आता 1.63 लाख रुपये इतकी आहे. केटीएम 125 ड्युक आणि 200 ड्यूक या बाईक्सच्या किंमतीत क्रमशः 1,497 आणि 2,576 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 250 ड्युकच्या किंमतीत 3,192 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केटीएम 390 ड्युकच्या किंमतीत कंपनीने 3,934 रुपयांची वाढ केली आहे. तर आरसी 200 आणि आरसी 390 च्या किंमतींमध्ये क्रमशः 3,021 रुपये आणि 3,803 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर केटीएम 250 अॅडवेंचरच्या किंमतीत 3,667 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, पाहा किंमत

KTM लव्हर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने RC 125 आणि RC 390 ची किंमत वाढवली, जाणून घ्या नवीन किंमती

प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?

(2021 KTM 890 Duke soon to be launched in india, here are the top features and other details)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें