बजाजची ‘ही’ बाईक फक्त 7 हजार रुपयांमध्ये मिळणार, जाणून घ्या कुठे? कशी?

बजाजची कॅलिबर ही बाईक सेकंड हॅन्ड बाईक फक्त 7 हजार रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. (Bajaj Caliber bike Droom)

  • Publish Date - 9:19 am, Wed, 27 January 21
बजाजची 'ही' बाईक फक्त 7 हजार रुपयांमध्ये मिळणार, जाणून घ्या कुठे? कशी?
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : कोणती बाईक घ्यावी?, फक्त या एका प्रश्नाचे उत्तर न सापडल्यामुळे अनेकांनी बाईक घेणं लांबणीवर टाकलेलं असतं. मात्र, नवी बाईक घेण्यापेक्षा जुनी बाईक खऱेदी करणे हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. कमी पैशांत दमदार मायलेज असणाऱ्या बाईक्स आज बाजारात उपलब्ध आहेत. बजाजची कॅलिबर ही बाईक सेकंड हॅन्ड बाईक फक्त 7 हजार रुपयांना मिळत आहे. droom.in या ऑनलाईन संकेतस्थाळाने ही ऑफर जारी केली आहे. (Bajaj Caliber bike is available for selling on Droom bike selling website )

फक्त 7 हजारांमध्ये बजाज Caliber

सेकंड हँड कार आणि बाईक विकणाऱ्या ड्रूम या संकेतस्थाळावर अनेक गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या संकेतस्थळाने बजाज कंपनीची कॅलिबर (Caliber) ही बाईक सेकंड हँड बाईक विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या बाईकची किंमत फक्त 7 हजार रुपये आहे. जाझियाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून ही बाईक विकण्यात येत आहे. विक्रीस असलेल्या या गाडीला 111.6 सीसीचे इंजिन आहे. तर ही गाडी आतापर्यंत 60 हजार किमी चाललेली आहे.

बजाज कॅलिबर बाईकचे फिचर काय?

बजाज कॅलिबर ही बाईक बजाज कंपनीने तयार केलेल्या दमदार बाईक्सपैकी एक आहे. कंपनीने या बाईकचे प्रॉडक्शन 1998-2006 या कालावधीत केले होते. या बाईकला कंपनीने 111.6 सीसीचे इंजिन पुरवले असून 8.1Nm टॉर्क जनरेट करण्याची या इंजिनची क्षमता होती. कॅलिबर बाईकला चार गियरबॉक्स आहेत.

droom.in बेस्ट ऑप्शन, टोकन अमाऊंट रिफन्डेबल

सेकंड हँड गाड्या घेण्यासाठी droom.in हे संकेतस्थळ एक चांगला ऑप्शन आहे.  वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक्स तसेच कार येथे विक्रीस उपलब्ध आहेत. सेंकड हँड गाडी घ्यायची असेल तर या संकेतस्थळाच्या मदतीने आपल्याला हव्या असणाऱ्या गाडीचा शोध घेता येऊ शकतो. एखादी सेकंड हँड गाडी आवडलीच तर नाममात्र टोकन अमाऊंट देऊन गाडी स्वत:च्या नावावर रजिस्टर करता येते.  खरदी व्यवहार रद्द झाला तर हे टोकन अमाऊंट परत दिले जाते.

दरम्यान, ऑनलाईन व्यवहारामध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे droom.in या संकेतस्थळावर खरेदी करताना, बाईक विकणाऱ्याला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कोणताही व्यवहार करु नका. सर्व शहानिशा केल्यानंतरच या संकेतस्थळावरुन बाईकची खरेदी करा.

संबंधित बातम्या :

अवघ्या 20 ते 40 हजारात सेकंड हँड Bajaj Avenger, V15, Super Splendor खरेदी करा!

Okinawa Scooter | स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लायसन्सचीही गरज लागणार नाही, किंमत फक्त…

(Bajaj Caliber bike is available for selling on Droom bike selling website )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI