अवघ्या 20 ते 40 हजारात सेकंड हँड Bajaj Avenger, V15, Super Splendor खरेदी करा!

तुम्ही जर बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अवघ्या 20 ते 40 हजारात सेकंड हँड Bajaj Avenger, V15, Super Splendor खरेदी करा!
अक्षय चोरगे

|

Jan 25, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली : तुम्ही जर बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अर्ध्या किंवा त्याहून कमी किंमतीत तुम्ही सेकंड हँड बाईक खरेदी करु शकता. त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जुनी बाईक खरेदी करणेदेखील फायद्याचे आहे, खासकरुन जे सध्या बाईक चालवण्यास शिकत आहेत किंवा शिकू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही एक बेस्ट ऑफर आहे. तसेच तुमचं बजेट कमी असेल आणि नवीन बाईक खरेदी करण्याईतके पैसे तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही सेकंड हँड बाईक खरेदी करु शकता. (Buy second hand Bajaj Avenger, V15, Splendor for 20 to 40 thousand rupees)

यामध्ये सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्हाला तुमची आवडती बाईक खरेदी करण्यासाठी कंपनीच्या शोरूममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून बाईक ऑर्डर करु शकता. त्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये सेकंड हँड बाईकचा पर्याय जरुर तपासून पहायला हवा. परंतु यामध्ये एक अडचण समोर उभी राहिली आहे. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर कर लावला तर या बाईकदेखील महाग होऊ शकतात.

जुनी दुचाकी खरेदी करण्यापूर्वी लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. जुन्या बाईक कुठे खरेदी करायच्या याबद्दल अनेकदा लोक संभ्रमात असतात. जर तुम्हीदेखील अशाच परिस्थितीतून जात असाल तर droom.in द्वारे तुम्हाला चांगली जुनी बाईक खरेदी करता येईल. तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवर तुमच्या पसंतीच्या बाईक शोधू शकता तसेच तुमच्या बजेटनुसार बाईकची निवड करू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयांच्या श्रेणीतील बाईक मिळतील. दरम्यान आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. जुनी बाईक खरेदी करताना कागदपत्रे आणि वाहनाची स्थिती (कंडिशन) तुम्ही स्वत: तपासा. तसेच वाहनाच्या मालकाची भेट न घेता किंवा वाहन न तपासता ऑनलाईन व्यवहार करू नका.

40 हजारांच्या आत बजाजची अॅव्हेंजर आणि V15 खरेदी करा

या वेबसाईटवर Bajaj V15 (बजाज वी15) 150 सीसी बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकचा पहिला मालक ही बाईक विकतोय. ही बाईक 30500 किलोमीटर धावली आहे. तसेच 57 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. यामध्ये 150 सीसी क्षमतेचं इंजिन आहे, जे 11.80 बीएचपी पॉवर जनरेट करतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. या बाईकची किंमत 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकची मूळ किंमत 67 हजार रुपये आहे. या वेबसाईटवर बजाज अॅव्हेंजर 31 हजार रुपयांमध्ये तर हिरो सुपर स्प्लेंडर 33 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 10 बाईक्स

बजाज CT110 – मायलेज 104 kmpl – किंमत 48,704 रु. टीव्हीएस स्टार सिटी – मायलेज 85 kmpl – किंमत 62,784 रु. बजाज प्लॅटिना – मायलेज 84 kmpl – किंमत 62,899 रु. हिरो सुपर स्प्लेंडर – मायलेज 83 kmpl – किंमत 71,650 रु. हिरो स्प्लेंडर प्लस – मायलेज 80 kmpl – किंमत 60,310 रु. होंडा सीडी 110 – मायलेज 74 kmpl – किंमत 65,505 रु. टीव्हीएस रेडीऑन – मायलेज 69 kmpl – किंमत 59,742 रु. होंडा शाईन – मायलेज 65 kmpl – किंमत 68,812 रु. हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट – मायलेज 61 kmpl – किंमत 65,672 रु. हिरो पॅशन प्रो – मायलेज 60 kmpl – किंमत 65,750 रु.

हेही वाचा

जुनी कार घ्यायचीय? मग ‘या’ ठिकाणी दीड ते तीन लाखात गाडी

किआ मोटर्सचा नवा प्लॅन; भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची तयारी

सरकारी कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीचं गिफ्ट; खास सवलतीसह आवडती कार खरेदीची संधी

(Buy second hand Bajaj Avenger, V15, Splendor for 20 to 40 thousand rupees)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें