जुनी कार घ्यायचीय? मग ‘या’ ठिकाणी दीड ते तीन लाखात गाडी

मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी असं एक ठिकाण आहे जिथं अगदी कमी किमतीत सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत.

जुनी कार घ्यायचीय? मग 'या' ठिकाणी दीड ते तीन लाखात गाडी


मुंबई : कार घ्यायची म्हटलं की त्यासाठी मोठी आर्थिक तजवीज करावी लागते. त्यामुळे प्रत्येकाला हे शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच अनेकजण आपलं कार घेण्याचं स्वप्न काहीशा वेगळ्या मार्गाने पूर्ण करतात. त्यासाठीचा एक सर्वमान्य पर्याय म्हणजे नवी कार घेण्याऐवजी चांगल्या स्थितीतील सेकंड हँड कार (Second Hand Maruti Cars) घेणं. मात्र, असं करताना सेकंड हँड कार विश्वासार्ह आहे की नाही असाही अनेकांचा प्रश्न असतो. मात्र, मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी असं एक ठिकाण आहे जिथं अगदी कमी किमतीत सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत (Cheap affordable second hand cars of Maruti Alto Swift Wagon R Baleno Swift Dzire Ritz).

जुनी गाडी घेणं अनेक अंगांनी फायद्याचंही मानलं जातं. कमी गुंतवणूक आणि मोठं नुकसान होण्याची भीती न बाळगता गाडीचा पुरेपुर वापर करण्याचं स्वातंत्र्य या निर्णयात आहे. याशिवाय नव्यानेच गाडी शिकत असलेल्यांसाठी तर जुनी गाडी खरेदी करणं बेस्ट पर्याय मानला जातो. कारण या गाड्या त्यांच्या मूळ किमतीच्या अर्ध्या किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत मिळतात. यासाठी मारुतीचं ट्रू व्हॅल्यू स्टोअर (Maruti True Value Store) हा चांगला पर्याय आहे. येथे अनेक प्रकारच्या गाड्या कमी किमतीत मिळतात.

Alto 800 LXI :

ट्रू व्हॅल्यू स्टोअरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 2013 चं मॉडेल असलेली Alto 800 LXI येते विक्रीसाठी उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन असणारी ही कार येथे 1 लाख 65 हजार रुपयांना खरेदी करता येणार आहे. ही कार 68,219 किलोमीटर चालली असून दिल्लीत उपलब्ध आहे.

Ritz LXI :

ही कार 2009 मधील असून पेट्रोलवर चालणारं इंजिन आहे. या कारची किंमत 2 लाख 25 हजार रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही गाडी 90 हजार किलोमीटर चाललेली असून दिल्लीत उपलब्ध आहे.

Wagon R LXI :

ही कार 2016 मधील असून तिला पेट्रोल इंजिन आहे. 77,873 किलोमीटर चाललेल्या या गाडीची किंमत 3 लाख 55 हजार रुपये इतकी आहे.

हेही वाचा :

किआ मोटर्सचा नवा प्लॅन; भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची तयारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत रांगा, गाड्या विनाटोल सोडल्याने ट्राफिक जाम आटोक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीचं गिफ्ट; खास सवलतीसह आवडती कार खरेदीची संधी

व्हिडीओ पाहा :

Cheap affordable second hand cars of Maruti Alto Swift Wagon R Baleno Swift Dzire Ritz

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI