मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत रांगा, गाड्या विनाटोल सोडल्याने ट्राफिक जाम आटोक्यात

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

  • मेहबूब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 11:02 AM, 15 Nov 2020
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन किमीपर्यंत रांगा, गाड्या विनाटोल सोडल्याने ट्राफिक जाम आटोक्यात

रायगड : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याला निघालेल्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. ट्राफिक जाम सोडवण्यासाठी अखेर काही वाहनं टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. (Mumbai Pune Express Way traffic jam cars allowed without collecting toll)

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रविवारला जोडून भाऊबीज-पाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबई आणि ठाणेकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळच्या सुमारास दीड ते दोन किमी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खालापूर टोलनाक्यावरुन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या टोल न घेता सोडल्या गेल्या. त्यानंतर मुंबई पुणे महामार्गावरील वाहन कोंडी काहीशी आटोक्यात आली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टोल किती?

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात एप्रिलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कार किंवा जीपसाठी 230 ऐवजी 270 रुपये मोजावे लागतात. तर मिनी बसला 355 ऐवजी 420 रुपये द्यावे लागतात. मोठ्या लक्झरी बससाठी 675 ऐवजी 797 रु. टोल आकारला जातो. सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे 40 ते 122 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागला, टोल दरात तब्बल 40 ते 122 रुपयांची वाढ

मुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा

(Mumbai Pune Express Way traffic jam cars allowed without collecting toll)