केवळ 5.70 लाखांना लाँच झाली Citroen C3, स्टाइलिश लुकसह दमदार फीचर्स

| Updated on: Jul 20, 2022 | 9:18 PM

नवीन C3 ची डिलिव्हरी सुरू झाली असून ग्राहक कंपनीच्या 20 La Maison phygital शोरूमला भेट देऊन कार बुक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ते देशातील 90 शहरांमध्ये कारची विक्री करणार असून त्या माध्यमातून ग्राहकांशी सरळ संपर्क साधून कारची डिलिव्हरी देण्यात येईल.

केवळ 5.70 लाखांना लाँच झाली Citroen C3, स्टाइलिश लुकसह दमदार फीचर्स
Citrone C3
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : भारतीय कार बाजारामध्ये सिट्रोन सी3 (Citroen C3) लाँच करण्यात आली आहे. या कारसाठी कंपनीची सुरुवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5.70 लाख रुपये आहे. कंपनीची भारतातील ही दुसरी कार आहे. कंपनीने 1 जुलैपासून प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही एसयूव्ही एक बी-सेगमेंट हॅचबॅक आहे. नवीन C3 ची डिलिव्हरी सुरू झाली असून ग्राहक कंपनीच्या शोरूमला भेट देऊन कार बुक करू शकतात. कंपनीचे म्हणण्यानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे (Online platform) ते देशातील 90 शहरांमध्ये कारची विक्री करणार असून त्या माध्यमातून ग्राहकांशी सरळ संपर्क साधून कारची विक्री केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची ग्राहकांना प्रतीक्षा होती, कंपनीकडून कारच्या फीचर्स (Features) व किंमतीची माहिती देण्यात आली नव्हती, परंतु साधारणत: या सेगमेंटमधील इतर कारच्या किंमती ऐवढीच किंमत कंपनीकडून ठेवण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

कारच्या किंमतीचा तपशिल

1.2 पेट्रोल लाईव्ह – 5.70 लाख.

1.2 पेट्रोल – 6.62 लाख.

1.2 पेट्रोल फील वाइब पॅक – 6.77 लाख.

1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन – 6.77 लाख.

1.2 पेट्रोल ड्युअल टोन वाइब पॅक – 6.92 लाख.

1.2 टर्बो फील ड्युअल टोन वाइब पॅक – 8.05 लाख.

इंजिन

Citroen C3 भारतीय बाजारपेठेत दोन इंजिनसोबत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये 1198 cc 3 सिलेंडर प्युरेटेक 82 नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड आणि 1199 cc 3 सिलेंडर प्युरेटेक 110 टर्बो इंजिनचा समावेश करण्यात आला आहे.

परफॉर्मेंस

कारचे Puretech 82 नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 5750 आरपीएमवर 82 पीएसची कमाल पॉवर आणि 3750 आरपीएमवर 115 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, Puretech 110 टर्बो इंजिन 5500 आरपीएमवर 110 पीएसची कमाल पॉवर आणि 1750 आरपीएमवर 190 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

मायलेज

कारचे Puretech 82 नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन 19.8 kmpl चा मायलेज देते. तर दुसरीकडे Puretech 110 टर्बो इंजिन 19.4 kmpl चा मायलेज देते.