Hybrid Ninja Bike | एकदम धुमशान! या कंपनीची Hybrid Ninja Bike मैदान मारणार
Hybrid Ninja Bike | वाऱ्याशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज रहा. कारण ही कंपनी तुमच्यासाठी खास निजा बाईक घेऊन येत आहे. ही निजा बाईक हायब्रीड असेल. ती इंधनावर धावेल आणि इलेक्ट्रिकचा पण तिला करंट असेल. या दोन्ही पॉवरमुळे ही बाईक तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाल्याशिवाय राहणार नाही. कधी येणार ही बाईक...
नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : सध्या इलेक्ट्रिक बाईककडे तरुणाईचा कल वाढलेला आहे. पेट्रोलला पर्याय देण्यासाठी कंपन्या अनेक मॉडेल बाजारात उतरवत आहेत. देशात बजाज कंपनी इलेक्ट्रिक बाईकच नाही तर सीएनजी, एलपीजी, इथेनॉल अशी व्यापक रेंज बाजारात घेऊन येणार आहे. सीएनजी बाईक तर लवकरच बाजारात येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्राहकांना भविष्यात दुचाकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतील. या कंपनीच्या स्पोर्टस बाईक जगभर चर्चेत आहेत. सर्वच देशात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ही कंपनी आता Ninja 7 Hybrid हे मॉडेल घेऊन येत आहे. जगभर त्याची चर्चा आहे. इंधनासह इलेक्ट्रिकवर ही बाईक धावणार आहे.
कावासाकीसाठी कासावीस
कावासाकी या कंपनीने Ninja 7 Hybrid ची घोषणा केल्यापासून तिची झलक पाहण्यासाठी तरुणाी कासावीस झाली आहे. ही हीयब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल (Hybrid Electric Vehicle) असेल. होंडाच्या DCT-गिअरबॉक्ससारखी या बाईकच्या क्लच-गिअरची संरचना असेल. स्विच क्लस्टरच्या बाजूला शिफ्ट पॅडलसोबत या बाईकमध्ये प्रयोग करण्यात आला आहे. वाहनधारकाला एका स्विचमुळे पहिला गिअर बदलता येईल, त्याविषयीचे संशोधन या बाईकमध्ये करण्यात आले आहे. ही प्रक्रिया स्वयंचलित असेल.
काय आहेत फीचर
451cc ट्विन वॉटर कूल्ड फोर स्ट्रोक इंजिन हे या बाईकचा दमदारपणा अधोरेखित करतो. यामध्ये 9kW ट्रान्झॅक्शन मोटार देण्यात आली आहे. ही बाईक वाहनधारकाला ऑटोमॅटिक रायडिंग अनुभव देईल. बाईकमध्ये 48V lithium-ion बॅटरी देण्यात येणार आहे. ही बॅटरी एकतर पेट्रोल इंजिनवर चार्ज होईल. इतर पण अनेक फीचर या बाईकमध्ये असतील. पण सर्वात महत्वाचे म्हणजे गिअर बदलण्यासाठी कंपनी देत असलेल्या स्वयंचलित प्रणालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कधी येणार बाईक
ही बाईक पुढील वर्षात, जानेवारी 2024 मध्ये युरोपियन मार्केटमध्ये धडक देणार आहे. स्पोर्ट्स बाईक चाहत्यांसाठी ही लॉटरीच असेल. त्यानंतर ही कंपनी जगभरात लवकरच बाईक पोहचविणार आहे. भारतात ही बाईक कधी येणार, याविषयीचा खुलासा कंपनीने केलेला नाही. या बाईकची किंमत किती असेल हे पण समोर आलेले नाही. पण या हायब्रीड निजाची जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे.