AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8000 रुपयात घरी न्या Activa 6G, दर महिन्याला केवळ ‘इतका’ EMI

सणांचा हंगाम सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकजण नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे. असे बरेच ग्राहक आहेत ज्यांना कमी किंमतीत त्यांच्या घरी स्कूटर, बाईक आणायची आहे.

8000 रुपयात घरी न्या Activa 6G, दर महिन्याला केवळ 'इतका' EMI
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई : सणांचा हंगाम सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकजण नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे. असे बरेच ग्राहक आहेत ज्यांना कमी किंमतीत त्यांच्या घरी स्कूटर, बाईक आणायची आहे. अशा ग्राहकांसाठी आज आम्ही असाच एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. आज आम्ही ज्या स्कूटरबद्दल सांगणार आहोत ती भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. होय, आम्ही होंडा अॅक्टिव्हा बद्दल बोलत आहोत. (Customers can buy honda activa 6G in just 8000 rupees, check bes EMI option)

जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही डील चुकवू नका. जर तुम्ही बाजारात नवीन होंडा अॅक्टिव्हा खरेदी करायला गेलात, तर तुम्हाला 69,080 ते 72,325 रुपये मोजावे लागतील. अशा परिस्थितीत, असे बरेच लोक आहेत जे सध्या इतके पैसे देऊ शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक डाउन पेमेंट योजना घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही कमी खर्चात होंडा अॅक्टिव्हा घरी घेऊन जाऊ शकता.

डाउनपेमेंट प्लॅन

ही स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला बाईकदेखो वर दिलेले डाउनपेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटर वापरावे लागेल. यानुसार, जर तुम्ही Honda Activa 6G चं स्टँडर्ड मॉडेल म्हणून खरेदी केले, तर कंपनी त्यासाठी 72,463 रुपयांचे कर्ज देईल. यासाठी तुम्हाला 8,051 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर, तुम्हाला दरमहा 2600 रुपये ईएमआय भरावा लागेल. कर्जाचा कालावधी 36 महिने आहे. त्याचबरोबर बँक एकूण कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज देईल.

Honda Activa 6G मध्ये काय आहे खास?

बाजारात या स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत, ज्यात स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 68,816 रुपये आणि डीएलएक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 71,316 रुपये इतकी आहे. यात 109 सीसी इंजिन देण्यात आलं आहे जे एफआयएस तंत्रज्ञानाने (फ्यूल इंजेक्शन सिस्टम टेक्नॉलॉजी) सुसज्ज आहे. हे इंजिन 8,000 आरपीएम वर 7.68 बीएचपी आणि 5,250 आरपीएम वर 8.79 एनएम पीक टॉर्कची उर्जा उत्पन्न करते.

Activa 6G ही स्कूटर Activa 5G च्या तुलनेत 10 टक्के अधिक मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या मते Activa 6G चं सरासरी मायलेज 55 ते 60 किलोमीटर इतकं आहे. या स्कूटरमध्ये रिमोट हॅच ओपनिंग, मल्टी-फंक्शन की तसेच इतर वैशिष्ट्ये आहेत. बाह्य इंधन भरण्यासाठीची कॅप (एक्सटर्नल फ्यूल फिलिंग कॅप) या स्कूटरमध्ये देण्यात आली आहे. यासह सीटच्या खाली 18 लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

इतर बातम्या

टाटाची नवी 10 लाख रुपयांची एसयूव्ही, जाणून घ्या काय आहे नाव आणि कधी होणार लाँच

निसान किक्स एसयूव्हीवर एक लाख रुपयांची सूट, विशेष लाभमध्ये 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील देतेय कंपनी

टेस्लाचे ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार, एक वर्षापासून सुरू आहे चाचणी

(Customers can buy honda activa 6G in just 8000 rupees, check bes EMI option)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.