Electric Car | बाईकच्या किंमतीत खरेदी करा इलेक्ट्रिक कार, स्वस्त इलेक्ट्रिक कार पाहिलीत का?

Electric Car | देशात इलेक्ट्रिक कार, बाईकची चलती सुरु आहे. केंद्र सरकारने पुन्हा सबसिडीचा डोस दिल्याने या वाहनांच्या विक्रीत वाढ दिसून येत आहे. देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती आहे, माहिती आहे का? ही कार बाईकच्या किंमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. चारचाकी दुचाकीच्या किंमतीत खरेदी करता येईल.

Electric Car | बाईकच्या किंमतीत खरेदी करा इलेक्ट्रिक कार, स्वस्त इलेक्ट्रिक कार पाहिलीत का?
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 7:36 PM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : देशात इलेक्ट्रिक वाहनांचं प्रचलन वाढलं आहे. देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये मांड ठोकण्यासाठी तयार आहेत. इलेक्ट्रिक कार आणि बाईकची संख्या झपाट्याने वाढत आहे. अगदी बाजाराच्या गावात सुद्ध ही वाहनं दिसायला लागली आहेत. केंद्र सरकारने पुन्हा सबसिडी सुरु केल्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार रस्त्यावर उतरल्या आहेत. पण या कार अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत. नेमकी हीच बाब हेरुन या कंपनीने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरु केले आहे. दुचाकीच्या किंमतीत ग्राहकांना इलेक्ट्रिक चारचाकी मिळत आहे.

कोणती आहे ही कंपनी

Yakuza Karishma या कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणली आहे. Yakuza Mini Electric Car असं या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. ही कार उत्पादन आणि विकसीत करण्याचे काम Maa Luxmi E-Vehicles Pvt. Ltd. करत आहे. एका दिवशी 200 हून अधिक कार उत्पादन करण्याची क्षमता या कंपनीची आहे. ही कार तीन आसनी आहे. ही कार दुचाकीच्या किंमतीत खरेदी करता येते.

हे सुद्धा वाचा

ही तर दुसरी Nano

भारतात सर्वात स्वस्त कार आणण्याचा मान टाटा मोटर्सला जातो. टाटाच्या Nano च्यावर हा विक्रम आहे. Nano चे उत्पादन कधीच बंद करण्यात आल आहे. आता इलेक्ट्रिक Nano ची चर्चा रंगली आहे. पण त्यापूर्वी या स्वस्त इलेक्ट्रिक कारने बाजी मारली आहे. तिला ग्राहक दुसरी Nano या नावाने ओळखायला लागले आहेत.

काय आहेत फीचर्स

Yakuza Mini Electric Car मध्ये पुश बटण, सनरुफ, टच स्क्रीन अशी जोरदार फीचर्स आहेत. याशिवाय या कारमध्ये एअर कंडिशनर आणि एलईडी लाईटची पण व्यवस्था करण्यात आली आहे. या कारमध्ये डिजिटल डिस्प्ले पण देण्यात आले. इतर पण काही फीचर्स या कारमध्ये आहेत. त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

रेंज, स्पीड आहे तरी काय

या इलेक्ट्रिक कारमध्ये एकाचवेळी तीन प्रवाशी जाऊ शकतात. यामध्ये दोन आसान आणि दोन दरवाजे देण्यात आले आहे. कंपनीने कारमध्ये एक टचस्क्रीन डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे. ही सिस्टिम अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत आहे ही कार 150 किलोमीटरची रेंज देते. फुल चार्जमध्ये ती 150 किलोमीटर धावते. या कारची सर्वाधिक वेग मर्यादा 80 किलोमीटर प्रति तास आहे.

किंमत आहे तरी काय

Yakuza Mini Electric Car ही भारतातील सर्वात स्वस्त कार असल्याचा दावा करण्यात येत आहे. जोरदार फीचर्ससह येणारी ही कार बाईकच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. ही कार 12 सेंकदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासचा पल्ला गाठू शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 1.25 लाख रुपये ठेवली आहे. तर टॉर व्हेरिंएटची किंमत 1.75 लाख रुपये आहे.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.