AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla भारतात धुमाकूळ घालणार, नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात, फीचर्स आणि ऑफर काय?

Tesla Model Y India: जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क याची कंपनी टेस्लाची इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. बाजारातील दिग्गज कार कंपन्यांना मोठी टशन असेल. या कारची फीचर्स आणि ऑफर्स आहे तरी काय?

Tesla भारतात धुमाकूळ घालणार, नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात, फीचर्स आणि ऑफर काय?
Tesla ची इलेक्ट्रिक कार बाजारात
| Updated on: Jun 24, 2026 | 3:20 PM
Share

Elon Musk Tesla Electric Car: इलेक्ट्रिक कारच्या बाजारात नवीन प्लेअर दाखल होत आहे. जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांची कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतीय बाजारात दाखल होत आहे. या कंपनीने त्यासाठी खास ऑफर आणली आहे. एक ओनरशीप प्रोगाम कंपनीने आणला आहे. त्यानुसार मस्क याची कंपनी या योजनेतंर्गत जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Tesla Model Y देणार आहे. त्याासाठी अगोदर 6 लाख रुपये डाऊन पेमेंट भरावे लागणार आहे. हे डाऊन पेमेंट भरल्यावर ग्राहकाला ही कार घरी नेता येईल.

पेट्रोलच्या खर्चात नवीन टेस्ला

टेस्ला कंपनीने हैदराबाद येथे नवीन एक्सपिरियन्स सेंटर उघडले आहे. तिथे ही खास योजना जाहीर करण्यात आली आहे. कारचा वापर असेल तर प्रत्येक महिन्याला साधारणपणे पेट्रोल आणि कार मेन्टनेसवर कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. जर ग्राहकाने टेस्लाचा ई-लीज योजनेत सहभाग घेतला. तर त्यांचा पेट्रोल कारवरील महिन्याचा मोठा खर्च वाचेल. या कारचा मासिक हप्ता 39,990 रुपये इतका असू शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल कारवरील खर्चापेक्षा केवळ 20,000 रुपये अतिरिक्त खर्च करून ही कार तुमची होऊ शकते. अर्थात कंपनीने सहा लाख रुपये डाऊन पेमेंटनंतर ग्राहकाला दरवर्षी किती EMI भरावा लागेल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

घर बसल्या दुरुस्त करा कार!

टेस्ला कंपनीने पारंपारिक कारच्या बाजारात नवीन भिडू आणला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या कारपेक्षा या कारचा मेंटेनन्सचा खर्च कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. कारसाठी 6 महिन्यात 10,000 किलोमीटरवर सर्व्हिसिंग करावी लागते. पण या कारसाठी इतका खर्च करावा लागणार नाही. तर टेस्ला ग्राहकांसाठी रिमोट डायग्नोस्टिक्स मॉडेल सादर करणार आहे. म्हणजे कारमध्ये बिघाड झाला. ती नादुरुस्त झाली तर टेस्लाची सॉफ्टवेअर टीम रिमोट तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या ती दुरुस्त करता येईल. त्यासाठी कंपनीच्या सर्व्हिसिंग सेंटरवर जावे लागणार नाही.

देशात कुठूनही खरेदी करता येईल कार

टेस्लाची सॉफ्टवेअर टीम रिमोटद्वारे ही कार दुरुस्त करू शकली नाही तर मग कंपनीचे कर्मचारी घरी येऊन कार दुरुस्त करून देईल. ही कार तुम्ही देशातील कोणत्याही भागातून बुक करू शकता. त्यांना कुठून ही टेस्लाची इलेक्ट्रिक कार खरेदी करता येईल. ही कार भारतीय रस्त्यावरही सुसाट धावेल असा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?