AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FASTag मधून दोन वेळा टोल कापला गेलाय? जाणून घ्या कसे मिळतील तुमचे पैसे परत…

सरकारने 15  फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले असून, ज्या वाहनांना फास्टॅग नाही, त्यांना देशभरातील इलेक्ट्रॉनिक टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.

FASTag मधून दोन वेळा टोल कापला गेलाय? जाणून घ्या कसे मिळतील तुमचे पैसे परत...
ज्या गाड्यांवर फास्टॅग नसेल त्या वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागेल.
| Updated on: Feb 16, 2021 | 5:43 PM
Share

मुंबई : सरकारने 15  फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले असून, ज्या वाहनांना फास्टॅग नाही, त्यांना देशभरातील इलेक्ट्रॉनिक टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्गांवर टोल कर वसूल करणारे सर्व प्लाझा ‘फास्टॅग लेन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा नियम 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून अंमलात आला आहे (Fastag what to do if twice deduction of toll charges from fastag).

डिजिटल पद्धतीने पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. यामुळे देयकासाठी घेतला जाणारा वेळ कमी होईल आणि इंधनाचा वापर देखील कमी होईल. यामुळे प्रवास सोपा आणि एकूणच सुखकर होईल. एम आणि एन श्रेणीच्या गाड्यांसाठी फास्टॅगमधून टोल टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. श्रेणी एम म्हणजे प्रवासी वाहून नेणारी चार चाकी वाहने, तर एन श्रेणी म्हणजे माल वाहून नेणारी चार चाकी वाहने. ही वाहने मालाव्यतिरिक्त माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.

बँकेकडे तक्रार दाखल करा

दरम्यान, लोकांना यासंदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, टोल प्लाझावर फास्टॅगमधून दोन वेळा पैसे कपात झाल्यास काय करावे?, कारण तसे होण्याची शक्यताही सध्या आहे. याविषयी माहिती देताना, एनपीसीआयच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले की, जर दुप्पट पैसे कपात केले तर ज्या बँकेकडून फास्टॅग खरेदी केले गेले आहे, त्याच्या ग्राहक सेवा केंद्राशी बोलावे लागेल. त्यांच्या संपर्क साधून, फास्टॅगमधून दोनदा टोल कापण्यात आल्याचे त्यांना सांगावे लागेल.

यानंतर बँक आपली तक्रार दाखल करेल आणि आवश्यक तपासणीनंतर आपल्या फास्टॅग खात्यात दोनदा कापण्यात आलेले पैसे परत केले जातील. एखाद्या विशिष्ट कालावधीत आपल्याला परतावा न मिळाल्यास आपण त्वरित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला पुन्हा कॉल करुन तक्रार नोंदवावी (Fastag what to do if twice deduction of toll charges from fastag).

कुठे तक्रार करावी?

बँकेकडे तक्रार नोंदवूनही आपले पैसे परत न आल्यास एनपीसीआयशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकाला देण्यात आला आहे. तक्रार करताना तुम्हाला एनपीसीआयला काही माहिती द्यावी लागेल, जसे की व्हीआरएन (वाहन नोंदणी क्रमांक, वाहन क्रमांक), टोल प्लाझाचे नाव, प्लाझा शहर आणि प्रवासाची तारीख. जर तुमचा व्यवहार बर्‍याचदा अयशस्वी झाला असेल, तर एनपीसीआयला वेगवेगळी तक्रार द्यावी लागेल. यासाठी एनपीसीआयने ट्विटर हँडल @FASTag_NETC  दिले आहे, जिथे आपण आपला मुद्दा मांडू शकता.

शहर बदलल्यावर फास्टॅग देखील बदलतो?

या सगळ्यात आणखी एक प्रश्न देखील आहे की, आपण शहर बदलल्यास वाहनाच्या फास्टॅगचे काय होईल? देशभरातील टोल प्लाझावर फास्टॅग नियम एकसारखाच लागू आहे, म्हणून आपल्याला तो बदलण्याची आवश्यकता नाही. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, शहर बदलल्यानंतर ताबडतोब आपण फास्टॅग जारी केलेल्या बँकेला कळवावे. देशातील 66हून अधिक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर फास्टॅग स्वीकारला जात आहे. ज्या टोल प्लाझावर फास्टॅग बसवला आहे, त्याच्या 500 मीटर अगोदर फास्टगचे साईनेज आणि बोर्ड लावले गेले आहेत, जेणेकरून ड्रायव्हरला आधीच कळेल.

फास्टॅग काम करत नसल्यास काय करावे?

आपण टोल नाका पास करताच, आपल्या फास्टॅग खात्यातून पैसे कपात केले जातात, ज्याची माहिती एसएमएसद्वारे आपल्या मोबाईलवर मिळते. या मेसेजमध्ये टोल प्लाझाचे नाव, व्यवहाराची तारीख, व्यवहाराची रक्कम आणि फास्टॅगमध्ये किती शिल्लक आहे, याबद्दल माहिती असते. आपला फास्टॅग टोल प्लाझावर काम करत नाही, ही समस्या येणे देखील शक्य आहे. अशा परिस्थितीत आपण 1033 टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपली तक्रार नोंदवावी. एनएचएआयने (भारत सरकार) महामार्ग वापरकर्त्यांसाठी 1033 कॉल सेंटरची स्थापना केली आहे.

(Fastag what to do if twice deduction of toll charges from fastag)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.