
देशातील आघाडीची मारुती सुझुकी कार कंपनी तिच्या आगामी मॉडेलसाठी स्वत:चा स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन तयार करीत आहे.हा हायब्रिड सिस्टीम सिस्टीम खास करुन एंट्री आणि मिड-लेव्हल सेगमेंट कारसाठी असेल. ही हायब्रिड टेक्नॉलॉजी टोयोटाच्या सिरीज-पॅरलल हायब्रिड सिस्टमपेक्षा वेगळी असणार आहे. आणि किंमतीही कमी असणार आहे.मारुती फ्रँक्स ही इन-हाऊस डेव्हलप केलेली स्ट्राँग हायब्रिड पॉवर ट्रेनवाली पहिली कार असणार आहे. याची लाँचिंग डेट अद्यापही निश्चित झालेली नाही. परंतू 2026 मध्ये ही बाजारात येणार आहे.
यानंतर नव्या पिढीची मारुती बलेनो दुसऱ्या क्रमाकांवर असेल, नंतर मारुती नवीन स-4 मीटर MPV येईल. नव्या बलेनोत डिझाईन आणि इंटेरियरमध्ये मोठे बदलासह पेट्रोल-हायब्रिड इंजिन असण्याची शक्यता आहे. येणारी कॉम्पॅक्ट MPV,सुझुकी स्पेशियावर आधारित होऊ सकते, जी सध्या जपानमध्ये विकली जात आहे. दोन्ही मॉडेल 2026 लाँच होऊ शकतात. यामुळे 2026 पर्यंत मारुती जवळ तीन प्रकारच्या हायब्रिड टेक्नॉलॉजी असतील, माईल्ड हायब्रिड, मारुतीची स्वत:ची स्ट्राँग हायब्रिड आणि टोयोटाकडून घेतलेला हायब्रिड सिस्टीम.
मारुतीची सर्वाधिक विकली जाणारी स्विफ्ट हॅचबॅक आणि ब्रेझा सब-कॉम्पॅक्ट SUV ला देखील ही नवीन सिरीज हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळणार आहे. नव्या जनरेशनची स्विफ्ट 2027 मध्ये हायब्रिड व्हर्जनमध्ये येईल. तर पुढच्या पिढीची ब्रेझा 2029 मध्ये या नव्या हायब्रिड टेक्नॉलॉजीसह लाँच होईल. दोन्ही मॉडेलमध्ये डिझाईन आणि इंटेरियरमध्ये मोठे बदल होणार आहेत.
मारुती कंपनी एक सिरीज हायब्रिड सेटअप विकसित करत आहे. ज्यात इंजिन केवळ जनरेटर वा रेंज एक्सटेंडर तऱ्हेने काम करेल. हायब्रिड सिस्टीने तयार होणारी वीज थेट इलेक्ट्रीक मोटरला दिली जाईल, जी चाकांना फिरवेल. हा सेटअप सिरीज -पॅरलल सिस्टीम पेक्षा जास्त सोपा असेल. तर मारुतीच्या हाय-एंड SUVs मध्ये टोयोटावाला स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम लावला जाईल. मारुती कार कंपनी आपल्या नव्या हायब्रिड सिस्टीमला Z12E तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिन सह आणणार आहे, जे आता स्विफ्टमध्ये मिळते. बातम्यानुसार येणाऱ्या मारुतीच्या हायब्रिड कार 35 kmpl हून अधिक मायलेज देतील.