येतेय होंडाची पहिली हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रीक बाईक, या दिवशी होणार लाँच
पेट्रोलचे महागडे दर पाहून संपूर्ण जग इलेक्ट्रीक वाहनांकडे वेगाने वळत आहे. या दरम्यान होंडाने मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी मोठी आणि हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणणार आहे.

होंडा लवरकच आपली पहिली हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रीक मोटर सायकल बाईक लाँच करीत आहे. कंपनी या बाईकला २ सप्टेंबर रोजी ग्लोबली लाँच करणार आहे. या बाईकचा शॉर्ट टीझर जारी केलेला आहे. या टीझरमध्ये या बाईकची एक पुसटशी झलक दाखवण्यात आली आहे. होंडाचे हे पाऊल त्या लाँग टर्म प्लानचा भाग आहे,ज्यात २०३० च्या आधी बाजारात अनेक इलेक्ट्रीक २ – व्हीलरना बाजारात आणले जाणार आहे. येणाऱ्या या बाईक खूपच स्टायलीश आणि क्लासी असणार आहेत.
होंडाने याआधी पहिली ईव्ही फन कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक बाईक जगासमोर आणली होती. होंडाने दावा केला होता की या इलेक्ट्रीक बाईकचा परफॉर्मेंस कोणा ५०० सीसी इंजिनवाल्या मोटरसायकलच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे अशी आशा आहे की होंडाची येणारी आगामी बाईक देखील या परफॉर्मेंससह येणार आहे. ही खूपच फास्ट, पॉवरफुल आणि लाँग रेंज मॉडेल असणार आहे. जे तरुणांना लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे.
दिसायला कशी असेल बाईक
होंडाच्या वतीने जारी केलेल्या टीझर इमेजमध्ये पाहाता येईल की बाईकमध्ये शार्प LED डेटाईम रनिंग लाईट, बार-एंड मिरर, हँडलबारवर क्लिप आणि TFT डिस्प्लेची सोय आहे. अशी आशा आहे की ही बाईक दिसायला कोणा स्ट्रीट नेकेड मॉडेलसारखी असणार आहे.याशिवाय बाईकचा स्टान्स स्पोर्टी आणि अग्रेसिव्ह असणार आहे.तसेच बाईकमध्ये सिंगल साईड स्विंग आर्म, १७ इंचाचे एलॉय व्हील टायर आणि फास्ट चार्जिंग कॅपेबिलिटी असणार आहे. ही बाईक कारसारखी वेगाने चार्ज देखील होऊ शकणार आहे.
भारतात केव्हा येणार
होंडा ही इलेक्ट्रीक बाईक आधी युरोपात लाँच करण्याचा शक्यता आहे. त्यानंतर विकसित देशात तिला लाँच केले जाणार आहे. भारतात ही बाईक लाँच होणार यात शंकाच नाही. निकटच्या काळात ती भारतात देखील लाँच होईल. भारतात सध्या होंडा देशात तयार झालेली इलेक्ट्रीक टु-व्हीलर होंडा एक्टीव्हा आणि QC1 सारख्या मॉडेल्सवर फोकस केले आहे. जर इलेक्ट्रीक स्पोर्ट्स बाईक नंतर भारतात आली तर ही युरोपात आधीच विकल्या जाणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट F77 सारख्या मॉडेलला टक्कर देऊ शकते.
