AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata : टाटा कार खरेदीवर 40 हजारांची बचत… हॅरियर, सफारी, टिगोर, टियागोवर बंपर डिस्काउंट ऑफर

टाटा मोटर्सने सप्टेंबर महिन्यासाठी त्यांच्या अनेक मॉडेल्सवर दमदार डिस्काउंट ऑफर जारी केल्या आहेत. या महिन्यात तुम्ही टाटा हॅरियर, सफारी, टिगोर आणि टियागो खरेदी करून तब्बल 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. आगामी सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांना मोठ्या सवलतींचा लाभ मिळू शकतो.

Tata : टाटा कार खरेदीवर 40 हजारांची बचत... हॅरियर, सफारी, टिगोर, टियागोवर बंपर डिस्काउंट ऑफर
टाटा मोटर्सImage Credit source: tv9
| Updated on: Sep 06, 2022 | 5:08 PM
Share

देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) सप्टेंबर 2022साठी टाटा कार्सच्या खरेदीवर मोठ्या डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. भारतीय ग्राहक सप्टेंबरमध्ये नवीन टाटा कार खरेदी करून तब्बल 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. सवलतीच्या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, सफारी, टिगोर आणि टियागो कारचा समावेश आहे. आगामी सणासुदीच्या काळात ज्या ग्राहकांना नवीन कारची खरेदी करायची आहे, अशांसाठी टाटाच्या कार्सचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांना सर्वात मोठी सूट टाटा हॅरियर (Tata Harrier) आणि सफारी एसयुव्हीवर (Safari SUV) मिळणार आहे. ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेटसारख्या फायद्यांचा समावेश आहे. टाटा सफारी, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा टिगोर सीएनजी अशा कार्सना आधीपासूनच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. आता डिस्काउंड आणि ऑफर्समुळे पुन्हा एकदा या गाड्यांची चलती पाहायला मिळणार आहे.

टाटा हॅरियर

हॅरियर एसयूव्ही खरेदीवर टाटा सर्वाधिक सूट देत आहे. भारतीय ग्राहक टाटा हॅरियर कार विकत घेतल्यावर एक्सचेंज बोनस 40,000पर्यंत सूट घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक नवीन एसयुव्ही खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटदेखील घेऊ शकतात. ही एसयूव्ही तिच्या स्पेस आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जाते.

टाटा सफारी

एक्सचेंज बोनस म्हणून हॅरियरसारखी टाटा सफारी विकत घेतल्यावर 40,000पर्यंत सूट मिळू शकते. दरम्यान, टाटा सफारीवर कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर असणार नाही. टाटा सफारीला देखील हॅरियरप्रमाणेच पॉवरट्रेन पर्याय मिळतात. त्याचबरोबर सफारीमध्ये थ्री-रो सीटचा फायदाही उपलब्ध आहे.

टाटा टिगोर सीएनजी

टाटा टिगोरच्या सीएनजी व्हेरिएंटच्या खरेदीवरही सूट मिळेल. नवीन Tata Tigor CNG खरेदी केल्यास, एक्सचेंज बोनस म्हणून 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याचबरोबर ऑफरमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची रोख सूट देखील समाविष्ट आहे. Tata Tigor CNG खरेदी केल्यावर ग्राहकांना एकूण 25,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

टाटा टियागो

Tata Tigor CNGप्रमाणे, Tata Tiago खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय Tiagoच्या प्रत्येक व्हेरियंटवर 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंटदेखील उपलब्ध आहे. टियागोच्या प्रत्येक व्हेरिएंटवर 3,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदेदेखील उपलब्ध असतील. दरम्यान, Tiago CNG सवलतीच्या ऑफरमध्ये समावेशित नसेल.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...