AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इलेक्ट्रीक दूचाकी मालकांसाठी आनंदाची बातमी, कंपनी देणार 287 कोटीचा रिफंड ! काय आहे नेमके प्रकरण

इलेक्ट्रीक दूचाकींना सध्या सर्वात जास्त मागणी आहे. परंतू या दूचाकी कंपन्यांनी केंद्राची सबसिडी मिळविताना घोळ घातला होता. त्यामुळे त्यांना आता आपल्या ग्राहकांना तगडा रिफंड द्यावा लागणार आहे.

इलेक्ट्रीक दूचाकी मालकांसाठी आनंदाची बातमी, कंपनी देणार 287 कोटीचा रिफंड ! काय आहे नेमके प्रकरण
electric two wheelerImage Credit source: socialmedia
| Updated on: May 04, 2023 | 6:35 PM
Share

मुंबई : इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासकरून इलेक्ट्रीक दू-चाकी वाहनांना मोठी मागणी आहे. आता ज्यांनी अलिकडेच नविन इलेक्ट्रीक टू – व्हीलर ( electric two wheeler ) विकत घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण प्रमुख इलेक्ट्रीक दूचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांना आपल्या ग्राहकांना रिफंड ( REFUND )  देणार आहेत. या इलेक्ट्रीक कंपन्यांनी ग्राहकांकडून वाहनांच्या चार्जरसाठी जादा रक्कम स्विकारली होती. त्याची परतफेड कंपन्या लवकरच ग्राहकांना करणार आहेत. ग्राहकांना एकूण 288 कोटी रूपयांचा रिफंड मिळणार आहे.

ओला इलेक्ट्रीकसह हीरो मोटोकॉर्प, एथर एनर्जी आणि टीव्हीएस मोटर कंपनी आदी कंपन्यांनी ईव्ही ऑफ-बोर्ड चार्जरकरीता ग्राहकांकडून जास्त रक्कम आकारली होती. ओला इलेक्ट्रीकने सोशल मिडीयावर घोषणा केली आहे. त्यात इलेक्ट्रीक टू- व्हीलर्स चार्जरसाठी आकारण्यात आलेली रक्कम परत केली जाईल असे म्हटले आहे. परंतू कंपनीने नेमकी किती रक्कम रिफंड केली जाणार आहे याचा खुलासा केलेला नाही. परंतू मिडीया आलेल्या एका अहवालानूसार ओला ग्राहकांना सुमारे 130 कोटी रुपये परत करणार आहे.

FAME 2 योजनेनूसार जी इलेक्ट्रीक दूचाकी वाहने 1.5 लाख रूपये ( एक्स शोरूम ) च्या रिटेल किंमतीत विकली जात आहेत, त्यांना केंद्राची 10,000 कोटी रूपयांच्या सबसिडी योजनेचा लाभास पात्र नाहीत. परंतू सबसिडी मिळवण्यासाठी या कंपन्या एक्स शोरूम किंमत कमी दाखविण्यासाठी आणि सबसिडी मिळण्यासाठी चार्जर आणि सॉफ्टवेअरचे स्वतंत्र बिल बनवित असल्याचे एमएचआयच्या तपासणीत आढळले.

या कंपन्या देणार इतका रिफंड

मिंटने दिलेल्या वृत्तानूसार ओला इलेक्ट्रीक 130 कोटी, एथर एनर्जी सुमारे 140 कोटी, टीव्हीएस मोटर्स आपल्या iQube इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी करणाऱ्यांना 15.61 कोटी, हीरो मोटोकॉर्प Vida V1 Plus च्या ग्राहकांना एकूण 2.23 कोटी रूपयांचा रिफंड आपल्या ग्राहकांना देईल. 12 एप्रिलपर्यंत विक्री झालेल्या वाहनांचा एथर एनर्जी रिफंड देईल. टीव्हीएस मोटर्स आणि मोटोकॉर्प मार्च 23 पर्यंत विकलेल्या वाहनांवर रिफंड देईल.

हीरो मोटोकॉर्पने किंमत घटवली 

या प्रकारानंतर हीरो मोटोकॉर्पने आपल्या Vida V1 Plus आणि V1 Pro रेंजच्या ई-स्कूटरची किंमत एकदम कमी केली आहे. V1 Plus ची किंमत 25000 रूपयांनी तर pro ची किंमत 19000 रूपयांनी कमी केली आहे. आता त्यांची किंमत अनुक्रमे 1.2 लाख आणि 1.4 लाख रु. ( एक्स शोरूम )ने सुरू होत आहे. या किंमती आता फेम 2 सबसिडी आणि पोर्टेबल चार्जरचा समावेश आहे. जो आधी स्वतंत्रपणे विकला जात होता.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.