Tata EV : Tata Avinya इलेक्ट्रिक कारची ‘ही’ 10 वैशिष्ट्ये पाहिलीत का?

इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व कायम आहे. टाटा ने एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार Avinya लाँच केली आहे. ही कार जेन 3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या लेखातून या कारची अशी 10 वैशिष्टये जाणून घेणार आहोत, जी तिला इतर सर्व कारपेक्षा वेगळी करतात.

Tata EV : Tata Avinya इलेक्ट्रिक कारची ‘ही’ 10 वैशिष्ट्ये पाहिलीत का?
Tata Avinya इलेक्ट्रिक कारची ‘ही’ 10 वैशिष्ट्ये पाहिलीत का?Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 10:36 AM

वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे याला पर्याय ठरु पाहणार्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. देशात सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या (Electric car) निर्मितीकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात टाटा मोटर्सचा (Tata Motors) विचार केल्यास कंपनीने सर्वात पहिले आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल केल्या असून इलेक्ट्रिक कार बाजारात टाटाचा दबदबा निर्माण झालेले आहे. कंपनी सध्या इलेक्टिक कार बाजारात आपली नवीन रणनीती आखून काम करीत आहे. टाटाच्या पुढील नवी कॉन्सेप्ट कार (Concept car) ह्या ग्लोबल इलेक्ट्रिक मॉडल फ्यूचर लाइन असलेले जेन 3 मॉडलवर आधारीत राहणार आहे. हा प्लेटफार्म केवळ इलेक्ट्रिक कारला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत टाटाच्या इलेक्ट्रिक कार जुन्या इंधन मॉडलवर आधारीत होत्या. परंतु आता टाटा पूर्णत: इलेक्ट्रिक कार तयार करत आहे.

आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या टाटाच्या इलेक्ट्रिक कार जुन्या कार्सच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या होत्या. परंतु आता जेनरेशन 3 प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक कारला समोर ठेवून बनविण्यात आल्या आहे. याशिवाय कंपनी आपले पुढील मॉडेल केवळ इलेक्ट्रिक कारला अनुसरुन तयार करणार आहे. त्यामुळे साहजिकच या कार इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत वेगळ्या असतील, टाटा Avinya ची काही खास वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

1. नवीन जेन 3 प्लॅटफॉर्मवर तयार झाल्याने या कारमधील इंटीरिअर स्पेस अजून जास्त मिळतो.

हे सुद्धा वाचा

2. जेन 3 टेक्नोलॉजीवर आधारी या कारची कमीत कमी रेंज 500 किमी असेल.

3. ग्लोबल लाइनअपसाठी टाटाने प्रीमिअम डिझाइन थीमसोबत या कारला लाँच केले आहे.

4. या कॉन्सेप्ट कारच्या इंटीरिअरमध्ये टिकाउ मेटेरियलचा वापर करण्यात आला आहे.

5. कंपनीने या कारला ईव्ही कारच्या डिझाईनसह लाँच केले आहे.

6. टाटाची ही नवीन जेनरेशन ईव्ही कार 2025 पर्यंत रस्त्यांवर दिसून येईल.

7. ही कॉन्सेप्ट कार ईव्ही शिवाय दुसर्या इंजीन किंवा इंधन व्हेरिएंटमध्ये मिळणार नाही.

8. या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टाटाने एक्सलच्या मधील जागेला पुर्णत वापरले आहे.

9. ही कार 4.3 मीटर लांब असून ती ह्युंडई केटाच्या बरोबरीला आहे.

10. ही कार फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह उपलब्ध होणार असून यात डाइव्हर असिस्टेंस सिस्टीम देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.