Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार

| Updated on: Apr 16, 2021 | 7:39 AM

हिरो डेस्टिनी 125 (Hero Destini 125) स्कूटर आता 3,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यासह खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Hero Destini 125 discount offer)

Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार
Hero Destini 125
Follow us on

मुंबई : हिरो डेस्टिनी 125 (Hero Destini 125) स्कूटर आता 3,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यासह खरेदीसाठी उपलब्ध आहे. एप्रिल 2021 या महिन्यात ही स्कूटर खरेदी करणारे ग्राहक 3,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस किंवा एक्सचेंज बोनससाठी पात्र ठरतील. कंपनीने नुकतेच या स्कूटरचे काही नवीन व्हेरिएंट्स सादर केले आहेत, त्यामुळे ही स्कूटर आता एकूण चार नव्या ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. (Hero Destini 125 available with a discount offer of 3000 rupeesa and Hero Connect Feature)

चार नव्या ट्रिम्समध्ये डेस्टिनी 125 LX, VX, प्लॅटिनम आणि 100 मिलियन एडिशनचा समावेश आहे. LX व्हेरिएंटची किंमत 69,150 रुपये ठेवण्यात आली आहे, तर VX व्हेरिएंटची किंमत 72,200 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. प्लॅटिनम ट्रिमची किंमत 73,250 रुपये आहे, तर टॉप ऑफ द लाइन 100 मिलियन एडिशनची किंमत 74,500 रुपये (सर्व किंमती एक्स शोरूम, मुंबई) इतकी आहे.

डेस्टिनी 125 मध्ये अलीकडेच ‘हिरो कनेक्ट’ हे फीचर देखील प्राप्त झाले आहे, जे अतिरिक्त 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे फीचर चालकास ट्रिप अॅनालिसिस, ड्रायव्हिंग स्कोअर, लाईव्ह ट्रॅकिंग, टो अवे अ‍ॅलर्ट, टॉपल अ‍ॅलर्ट, स्पीड अलर्ट, गो फेंस अलर्ट यासंबंधीच्या सूचना (अलर्ट) देतं आणि चाल या फीचरसह हिरो डिटेक्ट फंक्शन देखील वापरू शकतो.

दमदार इंजिन

इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर आवश्यक फॉर्म / तपशील भरून ही सुविधा मिळवू शकतात. डेस्टिनी 125 हिरो मोटोकॉर्पच्या लोकप्रिय स्कूटर्सपैकी एक आहे. यामध्ये 125 सीसी सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामध्ये XSens टेक्नॉलॉजी सह प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शनची सुविधा देण्यात आली आहे.

ही स्कूटर 9bhp पॉवर आणि 10.4 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्ससह आहे. डेस्टिनी 125 ही स्कूटर मार्केटमध्ये यामाहा फसिनो 125, टीव्हीएस एनटॉर्क 125, होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 आणि सुझुकी Access 125 या गाड्यांना टक्कर देत आहे.

55 KMPL मायलेज

या स्कूटरच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, डेस्टिनी 125 प्रवासाच्या स्थितीनुसार साधारणत: 50-55 किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देते. हिरोची ही स्कूटर तुमच्या बजेटमध्ये परफेक्ट बसेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये एक दमदार फीचर्स दिले आहेत.

इतर बातम्या

अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

(Hero Destini 125 available with a discount offer of 3000 rupeesa and Hero Connect Feature)