Hero Glamour 125 च्या नव्या मॉडेलची पहिली झलक सादर, जाणून घ्या काय असेल खास?

हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनी लवकरच आपली लोकप्रिय 125 सीसी मोटरसायकल म्हणजेच ग्लॅमरचं नवीन व्हेरिएंट बाजारात सादर करु शकते.

Hero Glamour 125 च्या नव्या मॉडेलची पहिली झलक सादर, जाणून घ्या काय असेल खास?
Hero Glamour XTec (Source Autoverse Ind)

मुंबई : हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनी लवकरच आपली लोकप्रिय 125 सीसी मोटरसायकल म्हणजेच ग्लॅमरचं नवीन व्हेरिएंट बाजारात सादर करु शकते. कंपनी या व्हेरिएंटला एक्सटेक (XTec) असे नाव देऊ शकते. ग्लॅमर फॅमिलीमधील हे नवं व्हेरिएंट सर्वात महत्वाचं असेल. कंपनीकडून यात बरेच नवीन बदल केले जात आहेत. कंपनीच्या सुपर स्प्लेंडर आणि ग्लॅमरने विक्री चार्टमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. दुसरीकडे, होंडा एसपी 125 ने या दोन्ही बाईक्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. (New Hero Glamour XTec photos leaked, check the new features)

आता कंपनी नवीन वैशिष्ट्यांसह ग्लॅमर ही बाईक बाजारात आणू शकते. कंपनी ग्लॅमर एक्सटेक नावाची नवीन मोटरसायकल बाजारात आणू शकते. ही बाईक संपूर्ण डिजिटल अ‍ॅनालॉग युनिटऐवजी संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येईल. फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की Xtec कंपनीच्या इंधन-बचत i3s तंत्रज्ञानासह येईल.

कन्सोलमध्ये, ग्राहकांना बरीच माहिती मिळेल ज्यामध्ये पोजिशन इंडिकेटर आणि डिजिटल टॅकोमीटरची माहिती असेल. त्याच वेळी, त्यामध्ये इंधन वापराच्या रीडआउटबद्दल माहितीदेखील मिळेल. XTec मध्ये स्टँडर्ड मॉडलच्या तुलनेत 2 टक्के चांगली इंधन कार्यक्षमता मिळणार असल्याचेही या लीक फीचरमध्ये समोर आलं आहे. आगामी हिरो ग्लॅमर एक्सटेक (Hero Glamour XTec) भारतात तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च होईल ज्यात टेक्नो ब्लॅक, ग्रे ब्लू आणि ग्रे रेडचा समावेश असेल.

कोणते फीचर्स मिळणार?

हिरो XPulse 200 प्रमाणेच त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात येईल. यात फुल एलईडी हेडलाइट्स देण्यात येतील, तसेच ही बाईक यूएसबी पोर्ट आणि कंबाइन्ड ब्रेकिंग सिस्टमसह येईल. वाहनात 124 सीसी मोटर देण्यात येईल, ज्यामध्ये 10.73 पीएस पॉवर आणि 10.6 एनएम टॉर्क मिळेल.

स्टँडर्ड मॉडेल सध्या शोरूममध्ये 73,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर उपलब्ध आहे. परंतु जर एक नवीन मॉडेल बाजारात आणले गेले असेल तर ग्राहकांना त्यासाठी 3000 ते 4000 रुपये अधिक मोजावे लागू शकतात. मात्र, अद्याप या वाहनाविषयीची इतकीच माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात अधिक माहिती लीक होऊ शकते.

Hero MotoCorp ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

देशातील शातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) अलीकडेच घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची (मोटारसायकल आणि स्कूटर) वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (CoronaVirus Second Wave) थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या वाहनांची वॉरंटी आणि नि:शुल्क सेवांचा कालावधी 60 दिवसांनी वाढवला आहे.

कंपनीने जाहीर केले की, आपल्या सर्व विद्यमान ग्राहकांच्या हितासाठी, सध्याच्या काळात वाया जाणाऱ्या सेवांच्या कालावधीत 60 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, या सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी घाईत डीलरकडे धाव घेऊ नये, यासाठी हा कालावधी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, हिरो मोटोकॉर्पने नुकतेच हरियाणामधील गुरुग्राम आणि धारुहेरा तसेच उत्तराखंडमधील हरिद्वार येथील तीन प्लांटमध्ये अंशतः कामकाज सुरू केले आहे.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(New Hero Glamour XTec photos leaked, check the new features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI