AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरो मोटोकॉर्पने लाँच केली डेस्टीनी 125 एक्सटेक… स्पेसिफिकेशन्ससह किंमत जाणून घ्या

नवीन एलईडी हेडलॅम्प, रेट्रो डिझाइन आणि आलिशान क्रोम एलिमेंट देण्यात आले असल्याने या स्कूटरला अधिक प्रीमियम लूक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर विविध फीचर्स, मायलेज व आकर्षक डिझाइनमुळे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

हिरो मोटोकॉर्पने लाँच केली डेस्टीनी 125 एक्सटेक... स्पेसिफिकेशन्ससह किंमत जाणून घ्या
Image Credit source: tv9marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 08, 2022 | 5:37 PM
Share

मुंबईः स्कूटरच्या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी उत्पादक कंपनी हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 एक्सटेक (Hero MotoCorp) हे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. हे नवीन व्हर्जन पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम असणार आहे. नवीन आलिशान डेस्टीनी 125 एक्सटेकला अनेक नवीन डिझाईन आणि थीम देण्यात आले असल्याने यामुळे ही स्कूटर अधिक आकर्षक झाली आहे. यात, नवीन एलईडी हेडलॅम्प, रेट्रो डिझाइन आणि आलिशान क्रोम एलिमेंट (element) देण्यात आले असल्याने या स्कूटरला अधिक प्रीमियम लूक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर विविध फीचर्स, मायलेज व आकर्षक डिझाइनमुळे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या लेखातून स्कूटरच्या इतर वैशिष्ट्ये (Features) व स्पेसिफिकेशनबाबत माहिती घेणार आहोत.

ही आहेत वैशिष्ट्ये

हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 मध्ये i3S तंत्रज्ञान, फ्रंट युएसबी चार्जर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्टसह नवीन डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, अधिक आराम आणि ड्रायव्हिंगसाठी साइड स्टँड इंजिन कट ऑफ आणि सीट बॅकरेस्ट यासारखी नवीन तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरला पूर्वीपेक्षा चांगले मायलेज, अधिक पिकअप आणि किमान मेंटेनन्स आहे. नवीन हिरा मोटोकॉर्पने डेस्टीनी 125 ची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 74950 रुपये आहे आणि डेस्टीनी 125 एक्सटेकची किंमत 80690 रुपये ठेवण्यात आली आहे.

काय आहे खास

एलइडी हेडलॅम्प्स : नवीन हेडलॅम्प्स लांब अंतरापर्यंत आणि संपूर्ण रस्त्यावर पोहोचताना चांगला प्रकाश देतात आणि सर्व ड्रायव्हिंग परिस्थितीत रस्त्यावर जास्तीत जास्त ऑन रोड व्हिजिबीलीटी देतात. प्रभावी हेडलॅंपमुळे रात्रीच्या वेळीदेखील स्कूटर चालविताना अतिशय कंफर्ट वाटते. या शिवाय अन्यदेखील फीचर्स स्कूटरमध्ये इनबिल्ट देण्यात आलेले आहेत.

प्रभावी मॉडर्न रेट्रो स्टाइल : नवीन डेस्टीनी 125 एक्सटेकमध्ये अनेक प्रीमियम क्रोम घटक आहेत जे स्कूटरचे शक्तिशाली रेट्रो कॅरेक्टर अंडरलाइन करतात. मिरर, मफलर प्रोटेक्टर आणि हँडलबारमध्ये क्रोम जोडण्यामुळे त्यातील टिकाऊपणा वाढतो. या शिवाय मागील सिटरसाठी ब्रँडेड सीट बॅकरेस्ट चांगल्या स्वरुपाचे आहे.

कनेक्टिव्हिटी : ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीन डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, आरटीएमआयसह वेळ देखील दर्शवतो. याशिवाय नवीन फ्यअल इंडीकेटर देखील देण्यात आला आहे. ही स्कूटर सात आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये खास नेक्सस ब्लूचा समावेश आहे.

इंजिन : डेस्टीनी 125 एक्सटेक 125 सीसी बीएस-व्हीआय इंजिनसह उपलब्ध आहे. ही स्कूटर राइडर आणि मागचा प्रवासी दोघांसाठी अत्यंत सुरक्षित अशी डिझाइन केलेली आहे. स्कूटरमध्ये साइड-स्टँड व्हिज्युअल इंडिकेशन आणि ‘साइड-स्टँड इंजिन कट ऑफ’ उपलब्ध आहेत.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी