Honda ची नवी स्क्रॅम्बलर CB350 RS लाँच, बाईक स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार

जपानी वाहन निर्माती कंपनी Honda सध्या 350cc सेगमेंटमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Honda ची नवी स्क्रॅम्बलर CB350 RS लाँच, बाईक स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 3:40 PM

मुंबई : जपानी वाहन निर्माती कंपनी Honda सध्या 350cc सेगमेंटमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कंपनीने नुकतीच Honda H’ness CB350 बाईक लाँच केली होती. ही बाईक भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच आता कंपनीने नवी स्क्रॅम्ब्लर बाईक (Scrambler Bike) भारतात लाँच केली आहे. (Honda CB350 RS Scrambler bike launched in India, know price and other specifications)

होंडाने त्यांची नवीन स्क्रॅम्बलर बाईक CB350 RS ही 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीत सादर केली आहे. होंडाच्या बिगविंग शोरुमद्वारे या बाईकची देशभरात विक्री केली जाईल. नवीन स्क्रॅम्बलर CB350 RS या बाईकमधील इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनीने 348.6cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर युक्त एयर कूल्ड इंजन दिलं आहे, हे 5 स्पीड गियरबॉक्ससह सादर करण्यात आलं आहे. तसेच हे इंजिन 20.78bhp दमदार पॉवर आणि 30Nm टॉर्क जेनरेट करु शकतं.

सोबतच या बाईकमध्ये स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे जे गियर शिफ्टिंग अजूनच स्मूथ बनवेल. फ्रंटला 310mm डिस्क आणि मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. CB350 RS मध्ये डुअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा (ABS) वापर करण्यात आला आहे. तसेच डुप्लेक्स क्रॅडल चेसिसवर तयार करण्यात आलं आहे. या बाईकच्या फ्रंटला तुम्हाला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि बॅक साईडला हायड्रॉलिक सस्पेंशन मिळेल.

Honda CB350 RS चे फीचर्स

नवीन Honda CB350 RS मध्ये कंपनीने रुंद टायर वापरले आहेत, जे रायडिंग अजूनच कम्फर्टेबल आणि बॅलेन्स्ड बनवतात. सोबतच या बाईकमध्ये राऊंड शेप हेडलँप, ब्लॅक ऑऊट शॉक अॅब्जॉर्बर (Shock Absorber) क्रोम मफलर, डुअल टोन फ्यूल टँक आणि सिंगल पीस सीटसह नवे ग्राफिक्स मिळतील.

या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलसह अॅनालॉग आणि छोटा डिजिटल डिस्प्लेदेखील मिळेल. या कंसोलमध्ये तुम्हाला ABS, साईड स्टँड इंडिकेटर, इको इंडिकेटर, रियल टाईम मायलेज, अॅवरेज मायलेज, स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिम (HSVCS) आणि गियर पोजिशनची माहिती मिळेल.

कंपनीने या बाईकमध्ये स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिमही दिली आहे. याद्वारे तुम्ही ही बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकता. बाईक फोनशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये HSVCS मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनद्वारे या बाईकमधील अनेक फीचर्स हाताळू शकता.

रॉयल एनफिल्डला टक्कर

रॉयल एनफिल्डप्रमाणे होंडाही आपले गेम प्लान अधिक बळकट करीत आहे. कंपनी एकाच सेगमेंटमध्ये अनेक प्रकारची मॉडेल्स आणत आहे. तथापि, प्रीमियम मोटारसायकलींसाठी तयार केलेले नवीन मॉडेल्स होंडा बिगविंग डीलरशिप अंतर्गत विकले जातील.

 कशी आहे  Honda H’ness CB350?

या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. तर या बाईकच्या DLX Pro व्हेरिएंटची किंमत 1.90 लाख रुपये आहे. हायनेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टॅन्क आहे.

हेही वाचा

TVS कडून शेजारील देशात Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच; जाणून घ्या खासियत

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

(Honda CB350 RS Scrambler bike launched in India, know price and other specifications)

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.