AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda लाँच करणार एकामागोमाग 5 अफलातून कार, इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कारवरही असणार फोकस

Honda Upcoming Cars: भारतीय लोकांमध्ये हायब्रिड कारची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे होंडाने नवीन PF2 प्लॅटफॉर्मवर आधारित तीन नव्या हायब्रिड कार बाजारात आणण्याची तयारी केली आहे. चला तर पाहूयात कोणत्या कार येत आहेत...

Honda लाँच करणार एकामागोमाग 5 अफलातून कार, इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कारवरही असणार फोकस
| Updated on: Jun 28, 2025 | 5:23 PM
Share

होंडाने भारतातील त्यांच्या भविष्यातील नव्या योजनांची घोषणा केली आहे. कंपनी साल 2029 पर्यंत देशात एकूण 5 नव्या कार लाँच करीत आहे. ज्यात हायब्रिड SUV, नव्या जनरेशनची Honda City, सब-4 मीटरची सुव्ह आणि दोन इलेक्ट्रीक कारचा समावेश असणार आहे. हे सर्व मॉडेल होंडाच्या नव्या PF2 मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित कार असणार आहेत. ज्या पेट्रोल, हायब्रिड आणि EV तिन्ही पॉवरट्रेनला सपोर्ट करणाऱ्या असतील..

2027 – नवीन 7-सिटर हायब्रिड SUV ची एण्ट्री

Honda 2027 मध्ये एकदम नवीन 7-सीटर SUV सादर करणार आहे. जी सध्याच्या Honda Elevate च्या पुढचे मॉडेल असणार आहे.या सुव्हमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिनासह स्ट्रॉन्ग हायब्रिड सिस्टम दिली जाणार आहे. जी तिला Toyota Innova Hycross सारख्या कारबरोबर उभी करणार आहे. ही कार Honda च्या PF2 प्लॅटफॉर्मवर आधारित कार असणार असून जी मल्टी-एनर्जी सपोर्ट करणार आहे.

2028 मध्ये 6Th जनरेशन Honda City लॉन्च होणार

2028 मध्ये होंडा तिचे लोकप्रिय मॉडल City चे सहाव्या जनरेशनचे मॉडल लॉन्च करणार आहे. यात संपूर्ण नवे डिझाईन , मॉडर्न टेक्नोलॉजी आणि चांगली फ्यूएल एफिशिएन्सीसह स्ट्रॉन्ग हायब्रिड पॉवरट्रेन देखील सामील आहे. या शिवाय रेग्युलर पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाणार आहे. या कारचे प्रोडक्शन मे 2028 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

2029 मध्ये नवीन सब-4 मिटर SUV

Honda 2029 मध्ये एक नवीन सब-कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करणार आहे. जी संपूर्णपणे भारतीय ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन तिची डिझाईन केली आहे.हीला देखील PF2 प्लॅटफॉर्मवर तयार केले जाणार आहे. आणि यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम सामील केले जाऊ शकते. हीचा मुकाबला Tata Nexon आणि Maruti Brezza कारशी होऊ शकतो.

EV Elevate होणार इलेक्ट्रीक कार

Honda आपली पहिली इलेक्ट्रीक कार 2026 मध्ये EV Elevate च्या रूपात लॉन्च करणार आहे. ही कार सध्याच्या Honda Elevate वर आधारित असणार आहे.यात संपूर्णत: बॅटरी इलेक्ट्रीक पॉवरट्रेन असणार आहे. कंपनी भारतात या कारला मोठ्या प्रमाणावर लोकलाईज करण्याची योजना बनवत आहे. ज्याची किंमत 15 ते 18 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

EV Elevate च्या नंतर Honda 2029 पर्यंत एक आणि इलेक्ट्रीक सुव्ह लाँच करणार आहे. ज्यास EV Elevate च्या खाली पोझिशन केले जाणार आहे. नवीन EV देखील PF2 प्लॅटफॉर्मवर आधारित कार असणार आहे. या कारची किंमत 12 ते 14 लाख रुपयांदरम्यान असणार आहे, या कारच्या मॉडेलचा फोकस शहरी ग्राहक आणि युवक आधारीत असणार आहे.

किती असणार आहे किंमत?

Honda ची हायब्रिड कारची अंदाजित किंमत 15 लाख रुपयांपासून सुरु होऊन 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर EV Elevate ची किंमत सुमारे 18 लाखाच्या आसपास असणार आहे . छोट्या EV ची किंमत 12-14 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या होंडाच्या या कारचा मुकाबला Maruti Grand Vitara, Toyota Hyryder, Tata Nexon EV आणि Hyundai Creta EV सारख्या कारशी होणार आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.