AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीत 360 डिग्री कॅमेराचा सेटअप असणं किती महत्त्वाचं? असे आहेत फायदे

360 डिग्री कॅमेरा सेटअप वाहनाच्या विविध भागांमधील काही कॅमेरे एका सॉफ्टवेअरद्वारे जोडलेले आहेत जे कारच्या आजूबाजूच्या हालचाली एकाच स्क्रीनवर आपल्यासमोर आणतात. 360 डिग्री कॅमेरा सेटअपमध्ये कमीतकमी 4 कॅमेरे असतात, एक समोर, एक मागील बंपरवर आणि दोन साइड मिररवर. या सर्व कॅमेर्‍यांचे व्हिज्युअल एकत्र पाहिले असता, ड्रायव्हरला त्याच्या सीटवर बसून वाहनाभोवतीचे दृश्य पाहता येते.

गाडीत 360 डिग्री कॅमेराचा सेटअप असणं किती महत्त्वाचं? असे आहेत फायदे
360 डिग्री कॅमेरा सेटअप Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 29, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : एकेकाळी कार रिवर्स घेणं हे खरचं कौशल्याचं काम होतं. ज्याच्यामध्ये रिवर्स ड्रायव्हिंग स्किल असायचे त्याचं कारमध्ये बसलेल्यांकडून तोंडभरून कौतुक व्हायचं. याचं कारण म्हणजे कार रिव्हर्स घेणं हे खरचं जोखमीचं काम आहे. मात्र आता अनेक कारमध्ये रिवर्स कॅमेरा आल्याने ही जोखीम कमी झाली. मात्र यापुठे जावून टेक्नॉलॉजी आणखी अपग्रेड झाली आहे. आजकाल वाहनांमध्ये 360 डिग्री कॅमेरा सेटअप सामान्य होत आहे.  जर तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त बजेटच्या कार खरेदी केल्या तर तुम्हाला ही वैशिष्ट्ये बहुतेक वाहनांमध्ये आढळतील. ऑटो एक्सपर्ट शशिकांत कुळकर्णी यांच्याकडून आपण 360 डिग्री कॅमेरा (360 Degree camera) आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

रहदारी असलेल्या मार्गावर सर्वाधीक उपयोगी

तुम्ही जर नागपूर, पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात राहात असाल तर हमखास तुमची कार ट्राफिक जाममध्ये अडकत असेल. चारचाकी वाहानांची संख्या दिवसंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागतोय. ट्रॅफिक दरम्यान प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, अशा परिस्थितीत अनेक वेळा गाडीला स्क्रॅच होते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या वाहनात 360 डिग्री कॅमेरा सेटअप असेल तर ते तुम्हाला खूप मदत करते. कारमध्ये बसून तुम्ही बाहेर चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता.

360 डिग्री कॅमेरा कसा काम करतो?

360 डिग्री कॅमेरा सेटअप वाहनाच्या विविध भागांमधील काही कॅमेरे एका सॉफ्टवेअरद्वारे जोडलेले आहेत जे कारच्या आजूबाजूच्या हालचाली एकाच स्क्रीनवर आपल्यासमोर आणतात. 360 डिग्री कॅमेरा सेटअपमध्ये कमीतकमी 4 कॅमेरे असतात, एक समोर, एक मागील बंपरवर आणि दोन साइड मिररवर. या सर्व कॅमेर्‍यांचे व्हिज्युअल एकत्र पाहिले असता, ड्रायव्हरला त्याच्या सीटवर बसून वाहनाभोवतीचे दृश्य पाहता येते. काही महागड्या वाहनांमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप देखील लावलेला असतो.

360 डिग्री कॅमेरा सेटअप लावायला वेगवेगळा खर्च येतो. हे खर्चीक जरी असलं तरी गर्दीत गाडीला स्क्रॅच लागण्याची शक्यता कमी होते. तसेच गर्दीतून गाडी काढताना या कॅमेराचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे एकंदरीत महागाच्या गाडीत हा सेटअप लावणे फायद्याचेच आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?