रात्री कार चालवताना या पाच टिप्स लक्षात ठेवा, उपघाताची शक्यता होईल कमी
बरेच लोक लांबच्या प्रवासात रात्रीच्या वेळी गाडी चालवणे पसंत करतात, कारण यावेळी रस्त्यांवर फारच कमी रहदारी असते, त्यामुळे कमी वेळेत लांबचे अंतर कापता येते. पण दिवसा पेक्षा रात्री कार चालवणे थोडे अवघड असते.

मुंबई : दिवसा वाहन चालवण्यापेक्षा रात्री वाहन चालवणे अधिक आव्हानात्मक असते कारण कमी प्रकाश, कमी दृश्यमानता आणि जास्त थकवा यामुळे रात्री अपघात होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे गाडी चालवायची असेल तर काही गोष्टींची काळजी (Night Driving) घ्यावी लागेल. रात्रीच्या वेळी गाडी चालवण्याशी संबंधित 5 टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
1. कार चांगल्या स्थितीत ठेवा
आपल्या कारची योग्य प्रकारे देखभाल करा. तुमच्या कारचे हेडलाइट्स, ब्रेक लाईट्स आणि टर्न सिग्नल्स व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. तुमच्या कारमध्ये फॉग लाइट्स असतील तर तेही चालू ठेवा.
2. पुरेशी झोप घ्या
रात्री ड्रायव्हिंग करण्यापूर्वी, तुम्हाला पुरेशी झोप मिळाली आहे याची खात्री करा कारण अन्यथा तुम्ही जास्त थकून जाल आणि गाडी चालवताना झोप येईल, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.
3. तुम्ही थकले असाल तर विश्रांती घ्या
तुम्ही थकले असाल तर थांबा आणि विश्रांती घ्या. थकल्यासारखे वाहन चालवू नका कारण ते धोकादायक असू शकते. वेळोवेळी थांबून तोंड धुवून चहा प्या.
4. ओव्हरस्पीड करू नका
रात्रीचा रस्ता सुनसान पाहून अनेकदा लोक भरधाव वेगात गाडी चालवतात. असे करणे चुकीचे आहे, रात्रीच्या वेळी कधीही अतिवेगाने गाडी चालवू नये, कारण रात्री गाडी चालवताना अनेकदा झोप येते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. रात्री ड्रायव्हिंग करताना झोप येऊ नये म्हणून मधेच ब्रेक घेणं आणि रिफ्रेशमेंट घेत राहणं गरजेचं आहे. ओव्हरस्पीड करू नका आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. रात्रीच्या वेळी रस्त्याची स्थिती समजून घेणे अधिक कठीण आहे. त्यामुळे सावकाश आणि मर्यादीत वेगात चालवा.
5. लो-बीम आणि हाय-बीम
रात्री गाडी चालवण्यापूर्वी लो-बीम आणि हाय-बीमच्या वापराविषयी खात्री करून घ्या. कार कमी बीमवर चालवा आणि आवश्यक असेल तेव्हाच उच्च बीमवर स्विच करा. जर गाडीचे लाईट्स खराब झाले असतील किंवा नीट काम करत नसेल तर रात्री गाडी चालवणे खूप धोकादायक आणि अवघड असते. कारण त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला रस्ता नीट दिसत नाही तसेच समोरून येणाऱ्या वाहनांनाही वाहनाची उपस्थिती नीट समजू शकत नाही.
